advertisement

Bullet Train : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठं अपडेट, महत्त्वाचा टप्पा पूर्ण, कधी होणार सुरू?

Last Updated:

Bullet Train Project Update : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून काम वेगात सुरू आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Ahmedabad bullet train Palghar mountain tunnel update
Mumbai Ahmedabad bullet train Palghar mountain tunnel update
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्पाच्या बाबतीत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे
स्वप्न लवकरच साकारणार
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात डोंगरातील बोगद्याचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मंगळवारी या बोगद्याचा ब्रेक-थ्रू करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली.
डहाणू जवळील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण सात बोगदे बांधले जात असून मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-6 हा त्यातील दुसरा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 456 मीटर असून रुंदी 14.4 मीटर आहे. या बोगद्याचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने करण्यात आले आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांचा वापर केला जातो त्यामुळे कठीण आणि गुंतागुंतीच्या भूगर्भीय भागात काम करणे सुलभ होते. अवघ्या 12 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान राहिलेल्या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण 508 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 27.4 किलोमीटरचे बोगदे असून त्यात 21 किलोमीटर भूमिगत आणि 6.4 किलोमीटर पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सात डोंगरी बोगदे बांधले जात असून त्यांची एकूण लांबी सुमारे 6 किलोमीटर आहे.
advertisement
पालघर रेल्वे प्रकल्पांना गती
याशिवाय बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार-डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका, पालघर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आणि वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारणीची कामेही वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Bullet Train : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठं अपडेट, महत्त्वाचा टप्पा पूर्ण, कधी होणार सुरू?
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement