धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात ३ सख्या बहिणींची ९ व्या मजल्यावरून उडी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीत तीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, परिसरात खळबळ उडाली.
तीन सख्ख्या बहिणी पण एका चुकीच्या सवयीनं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका व्यसनानं हसतं खेळतं कुटूंब उद्ध्वस्त झालं. एकाच घरातून तीन सख्ख्या बहिणींची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबियांवर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तीन सख्ख्या बहिणी मोबाईलवर गेम खेळायचा. हा नाद इतका लागला की त्याच्या आहारी कधी गेल्या हे त्यांनाच समजलं नाही. गेम खेळता खेळता त्यांच्या आयुष्याचा खेळ झाला. हा खेळ आणि त्याचा शेवट इतका भयंकर होता की घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
का संपवलं तीन सख्ख्या बहिणींनी?
गेमिंगच्या आहारी गेलेल्या तीन मुलींनी इमारतीच्या ननव्या मजल्यावरुन खाली उडी मारली आणि आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ऑनलाईन गेमिंगचं व्यसन लागलं होतं आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. जेव्हा त्यांना गेम खेळण्यासाठी कुटुंबियांनी परवानगी दिली नाही. त्यावरुन ओरडले तेव्हा तिघींनी टोकाचं पाऊल उचललं.
आई-वडिलांनी हटकलं अन् घात झाला
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद परिसरात घडली आहे. ऑनलाईन गेम खेळण्यावरून कुटुंबियांनी हटकल्यानं संतापलेल्या तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तर परिसरात प्रचंड खळबळही उडाली आहे.
advertisement
कुठे घडली घटना?
गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. टॉवर नंबर B1 मधील फ्लॅट नंबर ९०७ मध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. या तीन बहिणींचं वय १६, १४ आणि १२ वर्ष असं होतं. या तिघींनाही ऑनलाईन गेम खेळण्याचं प्रचंड व्यसन होतं. मंगळवारी रात्रीही त्या गेम खेळत होत्या. त्यांचं आहारी गेलेलं पाहून घरातले ओरडले. फोन बाजूला ठेवायला सांगितला, तेव्हा त्या प्रचंड नाराज झाल्या. याच रागाच्या भरात, पालकांनी खोलीबाहेर पाऊल टाकताच तिघींनीही बाल्कनीतून खाली उडी घेतली.
advertisement
पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट
अवघ्या काही मिनिटांत तिन्ही लेकींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेनंतर संपूर्ण सोसायटीमध्ये शोककळा पसरली असून आसपासच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात या तिघींना ऑनलाईन गेमिंगचं व्यसन असल्याची माहिती मिळाली. आणखी यामागे काही कारण होतं का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Feb 04, 2026 10:54 AM IST







