हाडं मजबूत करण्यासाठी खा ‘या’ 3 गोष्टी, कधीच घ्याव्या लागणार नाहीत कॅल्शियमच्या गोळ्या
- Published by:Tushar Shete
Last Updated:
पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि जंकफूडमुळे शरीराला योग्य त्या प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात संधीवाताचा त्रास होऊ शकतो.
Winter Health Tips: बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेकांना लहान वयातच सतत अशक्तपणा आणि थकव्याच्या तक्रारी जाणवतात. पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि जंकफूड याला कारणीभूत आहेत. कारण शरीराला योग्य त्या प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. सांधेदुखीकडे जर दुर्लक्ष केलं याचं रूपांतर पुढे संधीवात होऊन तुमच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मजबूत हाडे असणे फार महत्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लोकांना सांधे दुखू लागतात. कधीकधी ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टियोआर्थरायटिसमुळे सुद्धा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची हाडे मजबूत तर होतीलच मात्र तुम्हाला कधीच संधीवात होणार नाही.
नाचणी
नाचणी देखील कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे, जो हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. नाचणी इतर धान्यांच्या तुलनेत अधिक पोषक असते. याशिवाय नाचणीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात,जे वेदना कमी करायला मदत करतात. त्यामुळे नाचणीच्या रोज सेवनामुळे सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

advertisement
सुकामेवा
सुकामेव्यात भरपूर प्रमाणात पोषके असतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय त्यात असलेलं ओमेगा -3 फॅटी ॲसिड सांध्यासाठी चांगलं मानलं जातात. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे अशांना सुकामेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

अननस
हाडं मजबूत करण्यासाठी अननस खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबर असतात, ज्यामुळे शरीरातील सूज आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. अननस हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 3:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हाडं मजबूत करण्यासाठी खा ‘या’ 3 गोष्टी, कधीच घ्याव्या लागणार नाहीत कॅल्शियमच्या गोळ्या