दह्याचे फायदे
- दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते यामुळे गॅसेस किंवा बद्धकोष्ठता सारख्या आजरांपासून आराम मिळू शकतो.
- दही खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते.
- शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही उत्तम नैसर्गिक औषध आहे.
- दह्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि झिंक मिळते जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढवते.
- काही जण वजन कमी करण्यासाठीही दही खातात. यातील उच्च प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते. ज्यामुळे अतिरिक्त आहार टाळला जातो आणि शरीराचे वजन नियंत्रित राहू शकतं.
- त्वचा निरोगी ठेवण्यातही दही मदत करतं. दह्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. यामुळे त्वचेला पुरेसे हायड्रेशनही मिळते.
advertisement
'वजन कमी करायचं आहे पण, जंक फूड खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही? फॉलो करा या टिप्स'
advertisement
हिवाळ्यात दही खावं की नाही याबद्दल आहारतज्ज्ञ भावेश गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.
भावेश गुप्ता डाएट संदर्भातल्या टिप्स नेहमी शेअर करत राहतात. भावेश म्हणतात की, ‘लोकांना वाटते दही हे थंड आहे. पण, आयुर्वेदानुसार दह्याचं स्वरूप उबदार असते आणि हिवाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे होतात.दही हे प्रोबायोटिक अन्न आहे जे शरीराला फायदेशीर बॅक्टेरिया प्रदान करते. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 असते ज्यामुळे ते हिवाळ्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2024 1:06 PM IST