बऱ्याच लोकांचं असं मत आहे की, सनस्क्रीन आपण प्रत्येक 2 ते 3 तासांनी लावलं पाहिजे. तर काही लोकांना वाटतं आपण फक्त घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावलं पाहिजे. याच एकही प्रश्नाची उत्तर आज या लेखात दिलेली आहेत. themarathidermat या अकाऊंटवर डर्माटॉलॉजिस्टने सनस्क्रीन लावण्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सनस्क्रीन लावण्याचे फायदे..
सनस्क्रीन वापरल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. सनस्क्रीन न लावता सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात राहिल्याने त्वचेचे नुकसान, अकाली वृद्धत्व आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. यासाठी हाय SPF असलेले सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन लावल्यानं त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया सूर्याच्या किरणांमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होते.
advertisement
सनस्क्रीन ना लावता सूर्यप्रकाशात राहिल्यानं सुरकुत्या, बारीक रेषा, वयानुसार येणारे डाग आणि त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते. रोज 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन वापरल्यानं तुमच्या त्वचेचा रंग एकसमान राहतो. सनस्क्रीनचा रोज वापर केल्यास त्वचेवरचे काळे डाग फिके होतात आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
दिवसातून कितीवेळा सनस्क्रीन लावावं?
डर्माटॉलॉजिस्टने सांगितले की, पूर्वीच्या काळी कमी SPF प्रोटेक्शन असलेले सनस्क्रीन मिळायचे. त्यामुळे ते जास्तवेळा लावावे लागायचे मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता बाजारात SPF 30 पासून ते 50-60 पायांत सनस्क्रीन उपलब्ध आहेत. आत्ताचे आधुनिक सनस्क्रीन हलके, टिकाऊ आणि दिवसभर त्वचेचं रक्षण करण्यासाठी बनवलेले असतात. त्यामुळे तुम्ही ते ते प्रत्येक 4 ते 6 तासांनी परत लावू शकता. या प्रमाणात सनस्क्रीन लावल्यास तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित राहाते आणि टॅनदेखील होत नाही.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
