TRENDING:

उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी या समस्येवर प्रभावी उपाय शोधला आहे. त्यांनी कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कमी खर्चात दोन वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी या समस्येवर प्रभावी उपाय शोधला आहे. त्यांनी कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कमी खर्चात दोन वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. रविंद्र मेटकर सांगतात की, त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण होते. यासाठी त्यांनी काही ठिकाणी स्वयंचलित आणि वातानुकूलित यंत्रणा बसवली असली, तरी पत्र्याच्या शेडमध्ये तापमान नियंत्रणासाठी त्यांनी स्वतंत्र उपाययोजना केल्या.

advertisement

'एक डबा दोघांमध्ये अन् रविवारी उपाशी राहावं लागतंय' पुण्यातलं वास्तव्य, विद्यार्थी निघाले गावाकडे!

यामध्ये त्यांनी टाइमरवर चालणारे फॉगर बसवले आहेत. त्यामुळे ठराविक वेळेनंतर फॉगर सुरू होऊन वातावरणात हलकी पाण्याची फवारणी होते. यामुळे शेडमधील तापमान कमी राहते, पण कोंबड्या पूर्णपणे ओल्या होत नाहीत. याशिवाय, त्यांनी शेडच्या चारही बाजूंना बारदाना लावून त्यावर ठिबकची नळी बसवली आहे. या नळीमधून सतत थेंब-थेंब पाणी झिरपत राहते, त्यामुळे बारदाना ओला राहून परिसरात थंडावा निर्माण होतो. हा प्रयोग अतिशय कमी खर्चात करण्यात आला आहे.

advertisement

या दोन्ही उपायांचा त्यांना चांगला फायदा होत आहे. तापमान नियंत्रणात राहिल्यामुळे कोंबड्यांची तब्येत सुधारते, त्यांचे अन्न सेवन व्यवस्थित होते आणि अंड्यांचे उत्पादनही चांगले मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उष्णतेमुळे होणारा मृत्यूदर कमी झाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
सर्व पहा

रविंद्र मेटकर यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत गेले तरी या उपायांमुळे शेडमधील तापमान सुमारे 37 अंशांपर्यंत नियंत्रित ठेवता येते. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही कमी खर्चात प्रभावी उपाय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल