TRENDING:

Steel Water Bottle Safety : तुम्ही स्टीलच्या बॉटलमधून पाणी पिताय की विष? डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा...

Last Updated:

Is steel water bottle really safe : प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या सुरक्षित आणि टिकाऊ मानल्या जातात. परंतु त्यांचा नियमित वापर आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्लास्टिकला पर्याय म्हणून आजकाल अनेकजण घरात ऑफिसमध्ये किंवा जिममध्ये स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करत आहेत. प्लास्टिकच्या तुलनेत स्टीलची बॉटल पाणी पिण्यासाठी चांगली असते असा दावा केला जातो. परंतु सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओंमधून स्टीलच्या बाटल्यांमधील पाणी 'विषारी' असल्याचा दावा केला जात आहे. या भीतीदायक दाव्यामुळं आता अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. स्टीलची बाटलीही सुरक्षित नसेल तर मग कोणती बाटली वापरावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर गुडगावच्या फोर्टिस हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन फिजिशियन डॉ. सतीश कौल यांनी मार्गदर्शन केले आहे.
पेय दीर्घकाळ साठवून ठेवणं योग्य आहे का?
पेय दीर्घकाळ साठवून ठेवणं योग्य आहे का?
advertisement

डॉ. सतीश कौल यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं की, प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या सुरक्षित आणि टिकाऊ मानल्या जातात. परंतु त्यांचा नियमित वापर आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही यावर अनेक लोक प्रश्नचिन्ह विचारतात. त्यामुळं आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की चांगल्या दर्जाच्या फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून म्हणजेच 304 किंवा 316 ग्रेड ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या बाटल्या आरोग्यासाठी सुरक्षित मानल्या जातात.

advertisement

डॉ. कौल यांच्या मते चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या बाटल्यांमधून पाण्यात हानिकारक रसायनं मिसळण्याची शक्यता खूपच कमी असते. परंतु हेच प्लास्टिकच्या बाटल्यांच्या बाबतीत एक चिंतेची बाब ठरू शकते. अनेक आरोग्य तज्ञ प्लास्टिकपेक्षा स्टीलच्या बाटल्यांना एक चांगला पर्याय मानतात यामागे हेच कारण आहे. पंरतु स्टीलची बाटली वापरताना काही खबरदारी नक्की घेणं गरजेचं असतं.

advertisement

धातूचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळण्याची शक्यता

स्टीलची भांडी आरोग्यासाठी सुरक्षित मानली जात असली तरी ते वापरताना काही खबरदारी घेणं गरजेचं असतं. बाटली निकृष्ट दर्जाची असेल किंवा त्यातील धातूचं प्रमाण स्टँडर्ड नसेल तर कालांतराने धातूचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. हा धोका अतिशय स्वस्त किंवा अप्रमाणित उत्पादनांमध्ये जास्त असतो. शिवाय बाटलीच्या आतील भागावर ओरखडे आले किंवा गंज चढला तर ती बदलणं गरजेचं असतं. तुम्ही स्टीलची बाटली पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

advertisement

बाटलीची नियमित स्वच्छता करणं गरजेचं

स्टीलच्या बाटल्या वापरताना स्वच्छतेचा विचार करणंही आरोग्यासाठी अतिशय गरजेचं अशतं. कारण अनेकजण स्टीलच्या बाटल्या योग्यरित्या स्वच्छ न करता दीर्घकाळ वापरतात. यामुळं बाटलीच्या आत जिवाणू किंवा बुरशीची वाढ होऊ शकते. तुम्ही त्यात पाण्याव्यतिरिक्त ज्यूस, सरबत किंवा इतर पेये ठेवत असाल तर याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तुम्ही वापरत असलेली स्टीलची पाटली बाटली दररोज कोमट पाण्यानं आणि सौम्य साबणानं स्वच्छ करून वापरा. तसेच वेळोवेळी ती पूर्णपणे कोरडी करून ठेवा आणि त्यानंतरच वापरा. यामुळे त्यात जिवाणू किंवा बुरशी वाढण्याची शक्यता कमी होते.

advertisement

पेय दीर्घकाळ साठवून ठेवणं योग्य आहे का?

काही लोक स्टीलच्या बाटल्यांमध्ये लिंबू सरबत किंवा व्हिनेगरयुक्त पेयांसारखी जास्त आम्लयुक्त पेये दीर्घकाळ साठवून ठेवतात. डोभळ मानानं विचार केला तर ही तशी मोठी समस्या नाही. परंतु अशी पेये काही तास साठवून ठेवल्यास त्यांची चव धातूसारख्या चवीत बदलू शकते.

डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिला?

डॉ. कौल यांच्या मते, चांगल्या दर्जाच्या स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या रोजच्या वापरासाठी सुरक्षित असतात. परंतु ते निवडताना योग्य ग्रेड निवडणं, त्यांची नियमित स्वच्छता करणं आणि बाटलीच्या आतिल भागावर आणि झाकणावर अधून मधून लक्ष देणं गरजेचं असतं. या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि बाटली वारंवार धुवून, कोरडी करून वापरली तर पाणी पिण्यासाठी स्टीलची बाटली सुरक्षित पर्याय ठरू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Steel Water Bottle Safety : तुम्ही स्टीलच्या बॉटलमधून पाणी पिताय की विष? डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल