मध आणि गूळ
मध आणि गूळ या दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरीज सारख्याच प्रमाणात असतात; मात्र मध गुळापेक्षा सरस ठरतो तो ग्लायसेमिक इंडेक्सच्या बाबतीत. तसंच मधात अधिक पोषणमूल्यं असतात. गुळातही मॅग्नेशियम, तांबं, लोह अशी खनिजं असतात; मात्र मधात अँटीऑक्सिडंट्स, बी आणि सी व्हिटॅमिन, तसंच पोटॅशियम हे घटक असतात.
हेही वाचा - महिलांनी योग्य पद्धतीनं मेकअप कसा करावा? ‘या’ टिप्स करा फॉलो होईल फायदा
advertisement
रिफाइन्ड शुगर
रिफाइन्ड शुगरमध्ये एम्प्टी कॅलरीजचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे रिफाइन शुगर आहारातून शरीरात गेल्यावर वजन वाढतं. तसंच जीवनशैलीशी निगडित डायबेटीस आणि लठ्ठपणा हे विकार होण्याचा धोका वाढतो. मधात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे मध, तसंच लोहसमृद्ध मधाचा नियंत्रित वापर केल्यास तो रिफाइन्ड शुगरला उत्तम पर्याय ठरू शकतो आणि त्यामुळे खूप फरक पडू शकतो.
कॅलरीजचा खेळ
ब्राउन शुगर आणि व्हाइट म्हणजे नेहमीची साखर यांच्यामधली कॅलरीजची घनता जवळपास सारखीच असते. ब्राउन शुगरमध्ये प्रति 100 ग्रॅम्समागे 375 कॅलरीज असतात, तर व्हाइट शुगरमध्ये प्रति 100 ग्रॅम 390 कॅलरीज असतात. मधात 100 ग्रॅम्समागे 240 ते 330 कॅलरीज असतात. गुळात 100 ग्रॅम्समागे 380 कॅलरीज असतात.
सारांश
या सगळ्याचं सार असं सांगता येईल, की मध आणि गूळ हे निश्चितपणे रिफाइन्ड शुगरला पौष्टिक आणि हेल्दी पर्याय आहेत. त्यामुळे मर्यादित स्वरूपात आणि नैसर्गिक रूपात खाल्ल्यास हे दोन्ही पदार्थ चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. गरम पाणी आणि लिंबासोबत मध खाल्ल्यास शरीरातली विषद्रव्यं बाहेर पडण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. कच्च्या गुळात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तो पचनासाठी चांगला असतो आणि चयापचय सुधारण्यास मदत करतो.