जालना : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने सगळ्याच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्याचे चित्र पाहायला मिळालं. सध्या इतर भाजीपाल्याचे दर नियंत्रणात असले तरी शेवग्याचे दर आसमानाला भिडले आहेत. जालना शहरातील भाजीपाला बाजारातून शेवगा हद्दपार झाला आहे. शहरातील फुले मार्केटमध्ये एक किंवा दोनच दुकानावर शेवगा उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 400 रुपये प्रति किलो या दराने शेवग्याची विक्री होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडच पाणी शेवग्याने पळवलं आहे. त्यामुळे केवळ हॉटेल व्यावसायिक शेवग्याच्या भाजीची खरेदी करत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितले. पाहुयात काय आहेत शेवग्याच्या दर वाढी मागील कारणे.
advertisement
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. त्यामुळे शहरी वर्गाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक देखील शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याला आवश्यक प्राधान्य देतात. मात्र घटलेल्या अवकीमुळे शेवग्याची तर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना शेवग्याच्या शेंगा विकत घेणे आवाक्या बाहेर गेलं आहे. सध्या जालना शहरातील फुले मार्केटमध्ये केवळ दोनच दुकानावर शेवग्याच्या शेंगा उपलब्ध असल्याचे पाहायला मिळालं. तर शहरातील मुख्य भाजीपाला बाजारात तर शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नाहीयेत.
तब्बल एक महिना आधीच मृग बहाराची मोसंबी बाजारात, पाहा काय मिळतोय दर
थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्याच्या झाडाला फुले लागण्याचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे या दिवसांमध्ये शेवग्याच्या शेंगांची आवक नेहमीच कमी असते. मात्र यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत अधिक तुटवडा जाणवत आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून शेवग्याच्या शेंगा मागवतो हॉटेल व्यावसायिक आणि काही तुरळक सर्वसामान्य ग्राहक शेवग्याच्या शेंगांची मागणी करतात. 100 रुपये पाव आणि 400 रुपये किलो या दराने आम्ही या शेंगांची सध्या विक्री करत आहोत. हळूहळू आवक वाढण्यास सुरुवात होईल आणि तर 200 रुपये प्रति किलो पर्यंत खाली येतील. दोन महिन्यांनी 100 रुपये किलो पर्यंत शेवग्याच्या शेंगा मिळतील, असं विक्रेते अनिष्ट तांबोळे यांनी सांगितलं.





