TRENDING:

Kiwi Juice : किवी ज्युस पोटाच्या प्रत्येक कोपऱ्यातील घाण करेल साफ, हे 5 फायदे वाचून थक्क व्हाल

Last Updated:

किवीचा ज्युस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबरसह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. किवी ज्युस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. याच्या नियमित सेवनाने पोट चांगले साफ होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 9 ऑगस्ट : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. ज्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केले जाते. यासाठी आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि ज्यूस यांचा समावेश करावा असे सांगितले जाते. किवी हे असेच आरोग्यदायी फळ आहे. तुम्ही किवीचा ज्युसदेखील पिऊ शकता. किवीचा ज्युस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. किवी ज्युसमध्ये फायबर, कार्ब्स, फोलेट, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्याचे रोज सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला किवी ज्युसचे फायदे सांगत आहोत.
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
advertisement

1. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा : हेल्थला इनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. किवी ज्युस रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत करतो. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते. किवी ज्युस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी चांगला मानला जातो.

2. दृष्टी वाढवते : किवी ज्युसचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते. डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डोळे मजबूत ठेवण्यासाठी किवीचा रस सेवन करणे फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. या ज्युसचे सेवन केल्याने डोळ्यांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते.

advertisement

3. बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर : किवी ज्युस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. जर कोणाला पोटाचा त्रास असेल तर त्याने किवी ज्युसचे सेवन करावे. त्याच्या रोजच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. ते पचनसंस्था मजबूत करते.

4. वजन कमी करा : किवी ज्युसचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. वजन नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर किवी ज्युस नक्की घ्या. किवी ज्युसमध्ये दाहक-विरोधी, उच्च रक्तदाबविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुन्हेगारांना शोधणारा 'कुंचला', पोलीस दलात नसूनही आतापर्यंत केलं महत्त्वाचं काम
सर्व पहा

5. रक्तदाब नियंत्रित करते : किवी ज्युसचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुम्हीही मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असाल तर किवी ज्युस घ्या. किवी ज्युसमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kiwi Juice : किवी ज्युस पोटाच्या प्रत्येक कोपऱ्यातील घाण करेल साफ, हे 5 फायदे वाचून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल