जाणून घेऊयात ओव्याचे फायदे.
1) पचनावर रामबाण उपाय : जर तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेसचा सतत त्रास होत असेल तर तुमच्यासाठी ओवा हा कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीये. तुम्ही नुसता ओवा खाल्लात किंवा एक ग्लास पाण्यात ओवा रात्रभर भिजवून ठेवून ते पाणी सकाळी उठून पायल्यात तर तुमचा अपचनाचा त्रास दूर व्हायला मदत होईल.यामुळे आतड्य़ांना आराम मिळून त्यांचंही आरोग्य सुधारेल. जर तुम्ही ओवा आणि बडिशेप एकत्र करून खाल्ली तर त्याचे फायदे द्विगुणीत होतील. ओवा पचनात महत्त्वाची भूमिका बजावतो म्हणूनच जेवणानंतर अनेकदा बडीशोप बरोबर ओवाही खाल्ला जातो. ओव्याचे दाणे दिसायला जरी बारीक असले तरीही ते विविध पोषक तत्त्वांनी परीपूर्ण असतात. ओवा खाल्ल्याने ॲसिडिटी, अपचन आणि गॅसेस सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओव्यात असलेले सक्रिय एंझाइम्स पचन प्रक्रियेला चालना देतात आणि गॅस्ट्रिक रसाचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे जेवण पचायला मदत होते. ज्यांना अपचानाचा त्रास आहे, त्यांना जेवल्यानंतर ओवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
2) वजन कमी करण्यात फायद्याचं : बडीशेप आणि ओव्याच्या पाण्याचं नियमित सेवन केल्याने वजन देखील कमी व्हायला मदत होते. कारण ओवा आणि बडीशेपचं पाणी प्यायल्यामुळे तुमचं पोट आतून स्वच्छ व्हायला मदत होते. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते.
3) चयापचय वाढवतं : ओव्याचं पाणी प्यायल्यामुळे चयापचय क्रिया वाढते. यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचून शरीराला जास्त प्रमामाच ऊर्जा मिळते. यामुळे शरीर बळकट व्हायला मदत होते.
4) श्वसनविकारांवर गुणकारी : ओव्याचं पाणी हे श्वसनाच्या आजारांवर गुणकारी ठरतं. ओव्यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात जे घशातील किंवा श्वसनमार्गातील बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे श्वसन संसर्गाचा धोका कमी होतो. लहान मुलं जर आजारी पडली तर त्यांना तव्यावर ओवा भाजून, तो रूमालात बांधून नाकाजवळ धरला तर सर्दी,खोकल्याचा त्रास लवकर दूर होतो.
Benefits of Carrom seeds in Marathi: ओवा आहे इतका शक्तिशाली; एकदा खाल्ल्याने होतील इतके फायदे
5) त्वचा तजेलदार होते : ओव्यातमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. सूर्याच्या किरणांमुळे होणारं त्वचेचं नुकसान, सुरकुत्या, बारीक रेषा, डाग, काळी वर्तुळे दूर करण्यात ओवा प्रभावी आहे. ओव्यामुळे मुरुमांचे डागही कमी होतात. ओव्याच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार होते. ओव्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेतून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, ओव्यात असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेखालच्या कोलेजनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे त्वचा तजेलदार राहायला मदत होते.
