जाणून घेऊयात हळदीचे अनेक फायदे
औषधी गुणधर्म
'अनेक आजारांवर उपयुक्त औषध' असं हळदीचं वर्णन आयुर्वेदात आढळतं. दाहक-विरोधी गुणधर्म असलेली हळद उत्तम जंतुनाशक म्हणून काम करते. जखमा, वेदना आणि जळजळ यावर हळद लावणं फायदेशीर ठरतं. किरकोळ आजारापासून ते हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी हळद गुणकारी आहे.
advertisement
अनेक पोषकतत्त्वे
डॉ. आशिष गुप्ता जे एक आर्युवेदाचार्य आहेत, ते म्हणतात की, ‘हळदीमध्ये महत्त्वाची पोषक तत्त्वे आणि खनिजे असतात. एक चमचा हळदीमध्ये सुमारे 29 कॅलरीज असतात. हळद ही फायबर, प्रथिने आणि कर्बोदकांनी समृद्ध आहे. याशिवाय हळदीमध्ये मॅंगनीज, लोह आणि पोटॅशियम आढळून येतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.’
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर
डॉ. आशिष म्हणतात ‘हळदीच्या नियमित सेवनाने अनेक गंभीर आजार टाळता येतात. दररोज हळदीच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. मात्र, हळदीचं अतिसेवन हानिकारक ठरू शकते. हळदीच्या अतिवापरामुळे बद्धकोष्ठता, अतिसार, ओटीपोटात दुखणे, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. हळद हा केवळ मसाला नाही तर एक आरोग्यदायी औषध आहे.'
हळदीच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे हळद अनेक जुन्या आणि दुर्धर आजारांवर फायदेशीर ठरू शकते.
