पायात क्रॅम्प येण्याची कारणं
मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, बऱ्याच प्रकरणांमध्ये लेग क्रॅम्पचं कारण कळत नाही. हे मसल्स आणि नर्व्हच्या समस्यांमुळे येऊ शकतात. वयानुसार पायात क्रॅम्प येण्याची समस्या वाढते. गर्भवती महिलांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. याशिवाय काही जण अशी औषधं घेतात, की ज्यामुळे रात्री जास्त लघवी होते. यामुळे रात्री पायात क्रॅम्प येऊ शकतात; पण काही वेळा पायांच्या क्रॅम्पची कारणं गंभीर असू शकतात. किडनी फेल्युअर किंवा सिऱ्हॉसिसमुळेदेखील असं होऊ शकतं. चुकीची लाइफस्टाइल, खूप व्यायाम, बसण्याची चुकीची पद्धत, खूप वेळ उभं राहणं, नर्व्हच्या समस्याही यास कारणीभूत असू शकतात.
advertisement
इतर कारणं
1. अॅक्युट किडनी फेल्युअर
2. अॅडिसन डिसीज
3. अल्कोहोल डिसऑर्डर
4. हिमोग्लोबिनची कमतरता
5. क्रॉनिक किडनी डिसीज
6. सिऱ्हॉसिस
7. डीहायड्रेशन
8. हाय ब्लड प्रेशर
9. हायपोग्लायसेमिया
10. हायपोथायरॉइड
11. खराब लाइफस्टाइल
12. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलची औषधं
13. पार्किन्सन्स डिसीज
आराम कसा मिळवायचा
पायातले क्रॅम्प एक किंवा दोन मिनिटांत आपोआप बरे होतात; पण मसाज किंवा स्ट्रेच केल्यास ते लवकर बरे होतात. जेव्हा जेव्हा तुमच्या पायात क्रॅम्प येतात आणि खूप वेदना होतात तेव्हा काही काळ हिल्सवर किंवा तळव्यांवर प्रेशर देऊन चाला. यामुळे आराम पडेल.