पुदीना वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरावा?
फेस पॅक बनवा
उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला उष्णतेपासून आणि डागांपासून वाचवण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता. यासाठी मूठभर पुदिना घेऊन त्याची पेस्ट बनवा. आता ते एका काचेच्या बरणीत भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. आता ही पेस्ट नियमितपणे चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग तर दूर होतीलच शिवाय पिंपल्सची समस्याही दूर होईल.
advertisement
स्वयंपाक करताना घामाने हाल होतात? 'या' टिप्स वापरा, उन्हाळ्यातही किचन राहील थंड
माउथ वॉश म्हणून वापर
पुदिन्याचा वापर करून तुम्ही माउथ वॉश बनवू शकता. श्वासाची दुर्गंधी, हिरड्यामंध्ये जळजळ, दात किडणे यासारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी पुदिन्यापासून माऊथ वॉशर बनवा आणि दररोज वापरा. तुम्ही एकतर ते पाण्यात उकळून, बाटलीत साठवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज वापरू शकता किंवा त्याची पाने चावू शकता. अशा प्रकारे तोंडाच्या अनेक समस्या दूर राहतील.
शरीर थंड ठेवते
सध्या उन्हाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला उष्णतेमुळे खूप त्रास होत असेल किंवा तुमच्या त्वचेवर पुरळ उठत असेल तर पुदिन्याची पाने पाण्यात उकळून घ्या. आता हे पाणी गाळून थंड करा. आता हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि त्याने आंघोळ करा.
जळजळ दूर होते
उन्हामुळे त्वचेवर जळजळ होत असेल तर पुदिन्याचा वापर करा. यासाठी पुदिन्याची भरपूर पाने एका कढईत उकळून, थंड करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. हे पाणी थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने उन्हात जळलेल्या भागावर लावा. तुम्हाला आराम मिळेल.
शिटीऐवजी कुकरच्या झाकणातून वाफ बाहेर येतेय? 'या' 6 टिप्स वापरा, झटपट होईल स्वयंपाक
डास दूर पळवणे
घरात खूप माश्या आणि डास झाले असतील तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात उकळून स्प्रे बाटलीत ठेवा. घरामध्ये फवारणी करा. ते कीटकनाशकासारखे काम करेल. हे एक प्रेसर म्हणून देखील काम करेल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)