किती नवीन रूग्ण ?
चिनी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, चीनच्या विविध प्रांतात चार प्रकरणं सापडली आहेत. मात्र असं असलं तरीही मोठ्या प्रमाणात रूग्णांची काळजी घेतली जातेय. संक्रामित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवलं असून ज्यांचा गंभीर आजारांचा धोका आहे किंवा ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशावर चिनी प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. याशिवाय कांगो आणि आफ्रिकन देशातून आलेल्या व्यक्तीवर ही लक्ष ठेवलं जातंय.
advertisement
नव्या व्हायरसची लक्षणं काय ?
MPOX सुरूवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ आणि नागीण आजारासारखी लक्षणं दिसून येतात. यानंतर रूग्णांना ताप, किंवा थंडी वाजून ताप येतो.डोकेदुखी, अंगदुखी आणि घशाला सूज अशी लक्षणं काही रूग्णांमध्ये दिसून आली होती. सुरूवातीला त्वचेवर आलेल्या पुरळात नंतर फोड येऊन पू झाल्याचं दिसून येतं. हा त्रास चेहऱ्या पासून शरीराच्या कोणत्याही भागांवर अगदी गुप्तांगावरही होऊ शकतो. MPOX ची लक्षणे साधारणतः 2 ते 4 आठवड्यांपर्यंत दिसून येतात.
चीनने केल्या या उपाययोजना:
Mpox चा नवीन व्हायरस सापडल्यानंतर कांगो किंवा अन्य आफ्रिकन बाधित देशातून येणाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नवीन व्हायरस किंव मंकीपॉक्सशी संबंधित कोणतीही लक्षणं दिसल्यास आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. याशिवाय चीनी नागरिकांना उंदीर आणि माकडांपासून दूर राहाण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.