चहा जास्त वेळ उकळल्यास काय दुष्परिणाम होतात आणि चहा नेमका किती वेळ उकळला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊया.
देशात चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही. काही लोकांना चहा इतका आवडतो की ते दिवसाची सुरुवात आणि शेवट चहा पिऊनच करतात. बहुतांश लोकांची दुधाच्या चहाला पसंती असते. चहाचा रंग गडद होईपर्यंत तो उकळण्याची सवय काही लोकांना असते. तसेच काहीजण चहा घट्ट, गडद रंगाचा व्हावा यासाठी चहा पावडर जास्त टाकतात. तसेच काहींना जास्त उकळलेला चहा प्यायला आवडतं. यामुळे चहाची चव चांगली लागते. पण या गोष्टी आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. जास्त उकळलेला चहा त्रासदायक ठरू शकतो.
advertisement
दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्यास त्यातील टॅनिनचं प्रमाण वाढतं. हा चहा प्यायल्यास शरीरातील लोह कमी होतं. त्यामुळे अॅनामिया अर्थात रक्त कमतरतेचा आजार होऊ शकतो. दुधाचा चहा जास्त वेळ उकळून प्यायल्यास त्याची पीएच लेव्हल वाढते. त्यामुळे हा चहा पित्त वाढवणारा ठरतो. चहा जास्त वेळ उकळल्यास त्यातील अॅसिडिक गुणधर्म वाढतात. त्यामुळे पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. जर बनवून ठेवलेला चहा तुम्ही उकळून प्यायलात तर त्यातील टॅनिनचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढतं. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. दुधाचा चहा वारंवार उकळून प्यायल्यास दुधातील प्रोटिन, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम सारखे पोषक घटक कमी होतात किंवा नाहीसे होतात. त्यामुळे चहा फार वेळ उकळू नये.
चहा बनवताना सर्व साहित्य भांड्यात टाकल्यावर केवळ चार ते पाच मिनिटं तो उकळावा. जास्त वेळ चहा उकळला तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे चहा बनवताना या कालावधीकडे आवर्जून लक्ष द्यावे.