TRENDING:

No Bake Cheesecake : ओव्हन आणि बेकिंगची गरज नाही, ख्रिसमससाठी 3 स्वादिष्ट चीजकेक! पाहा रेसिपीज

Last Updated:

No Bake Cheesecake Recipe : कमी साहित्य, कमी मेहनत आणि तरीही रेस्टॉरंटसारखी चव, हे या डेझर्टचं खास वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे हे चीजकेक आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवता येतात. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही निवांतपणे सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ख्रिसमस म्हणजे आनंद, उत्साह, सजावट आणि गोड आठवणींनी भरलेला सण. या सणाच्या निमित्ताने घराघरांत खास पदार्थ, केक आणि डेझर्ट्स बनवण्याची तयारी सुरू होते. मात्र ख्रिसमसच्या गडबडीत ओव्हनमध्ये केक बनवणे, वेळेचं व्यवस्थापन आणि परफेक्ट टेक्सचर मिळवणे अनेकांना अवघड वाटते. अशा वेळी नो बेक चीजकेक (No Bake Cheesecake) हा एक परफेक्ट आणि उत्तम पर्याय ठरतो.
नो बेक चीजकेक रेसिपी
नो बेक चीजकेक रेसिपी
advertisement

कमी साहित्य, कमी मेहनत आणि तरीही रेस्टॉरंटसारखी चव, हे या डेझर्टचं खास वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे हे चीजकेक आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवता येतात. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही निवांतपणे सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता. म्हणूनच यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आम्ही घेऊन आलो आहोत 3 सोप्या, चविष्ट आणि No Bake Cheesecake रेसिपी. हे केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील.

advertisement

ओरिओ बिस्किट्स चीजकेक

साहित्य

- ओरिओ बिस्किट्स

- क्रीम चीज

- वितळलेले बटर

- पिठीसाखर

- व्हाइट चॉकलेट चिप्स

कृती

ओरिओ बिस्किट्स बटरसोबत बारीक करून बेस तयार करा. क्रीम चीज आणि साखर फेटून घ्या. व्हाइट चॉकलेट वितळवून मिश्रणात घाला. हे मिश्रण बिस्किट्सच्या बेसवर ओता आणि वरून ओरिओ क्रशने सजवा. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. चॉकलेट प्रेमींसाठी हा चीजकेक खास आहे. ओरिओ बिस्किट्सचा खमंग बेस आणि वर क्रीमी चीजकेक लेयर याची चव अप्रतिम लागते.

advertisement

चॉकलेट हॅझलनट स्प्रेड चीजकेक

साहित्य

- फ्रेश क्रीम

- क्रीम चीज

- आयसिंग साखर

- व्हॅनिला इसेन्स

- न्यूटेला

- हॅझलनट चॉकलेट स्प्रेड

- डाइजेस्टिव्ह बिस्किट्स

कृती

फ्रेश क्रीम हलकी गरम करा. क्रीम चीज, साखर आणि व्हॅनिला एकत्र ब्लेंड करा. त्यात गरम क्रीम आणि वितळलेले न्यूटेला-हॅझलनट स्प्रेड मिसळा. बिस्किट्सचा बेस करून त्यावर हे मिश्रण ओता आणि फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. न्यूटेला आणि हॅझलनट चॉकलेट स्प्रेडची चव आवडणाऱ्यांसाठी हा चीजकेक परफेक्ट आहे.

advertisement

क्लासिक चॉकलेट नो-बेक चीजकेक

साहित्य

- बिस्किट्स

- बटर

- डार्क चॉकलेट

- क्रीम चीज

- सॉर क्रीम

- कोको पावडर

कृती

बिस्किट्स आणि बटर मिसळून बेस तयार करा. डार्क चॉकलेट वितळवा. क्रीम चीज फेटून त्यात वितळलेले चॉकलेट आणि सॉर क्रीम घाला. हे मिश्रण बेसवर पसरवा आणि फ्रिजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना वरून कोको पावडर भुरभुरा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
No Bake Cheesecake : ओव्हन आणि बेकिंगची गरज नाही, ख्रिसमससाठी 3 स्वादिष्ट चीजकेक! पाहा रेसिपीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल