बरेच आरोग्य तज्ज्ञ मर्यादित प्रमाणात साखर न खाण्याची किंवा साखर पूर्णपणे सोडून देण्याची शिफारस करतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीये. ते सांगतात फक्त 14 दिवस साखर खायची सोडली तर शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल दिसून येऊ शकतात.
advertisement
पचनक्रिया, पोटाचं आरोग्य सुधारतं
डॉक्टर सेठी म्हणतात, तुम्ही 2 आठवडे साखर खाल्ली नाही तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं कारण आतड्यातले निरोगी बॅक्टेरिया पुनर्संचयित होतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि चयापचय क्रिया चांगली होऊन अन्न पचायला मदत होते.
'Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे'
चेहरा उजळतो
14 दिवस साखर न खाल्याचे चांगले आणि दूरगामी परिणाम दिसून येतात. सर्वात मोठा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. कारण, दोन आठवडे साखर न खाल्ल्याने शरीरातले अतिरीक्त फॅट्स बर्न होतात. चेहऱ्यावरचे फॅट्स कमी झाल्याने चेहराचा गोल आकारा जाऊन नैसर्गिक आकारात येऊ शकतो.
डोळ्यांची सूज कमी होते
जर तुम्ही साखर सोडली तर ते तुमच्या डोळ्यांभोवती येणारा फुगीरपणा आणि द्रव टिकवून ठेवण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळे कमी सुजलेले दिसतात.
त्वचेच्या समस्या दूर होतील
जर, मुरुमं किंवा लाल डागांची समस्या असेल, तर दोन आठवडे साखर न खाल्ल्याने तुम्ही मुरुम किंवा लाल डागांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक उजळ आणि स्वच्छ दिसते.