Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे

Last Updated:

तुळशीचा चहा आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे.तुळशीत असलेल्या अनेक पोषक तत्त्वांमुळे शरीराला अनेक फायदे होतात.

प्रतिकात्मक फोटो : तुळशीचा चहा
प्रतिकात्मक फोटो : तुळशीचा चहा
Benefits of Tulsi Tea आपण रोज सकाळी चहा पितो, मात्र या चहामुळे काही जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. चहात साखर किंवा गुळ असल्यामुळे तो डायबिटीसच्या रूग्णांना पिता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला असा चहा सांगणार आहोत जो डायबिटीसचे रूग्ण पिऊ शकतात. ‘हा’ प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढेल इतकंच काय तर डायबिटीस आणि हार्ट ॲटॅक सारख्या आजापांराही तुम्ही दूर ठेऊ शकता. आरोग्यवर्धक असा हा चहा तुम्ही घरच्या घरीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी आहेत तुळशीची पानं.
तुळशीच्या चहाचे फायदे
तुळशीचा चहा आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे.तुळशीत असलेल्या अनेक पोषक तत्त्वांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. तुळशीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, सी आणि फॉस्फरस इत्यादीसारखे महत्त्वाचे घटक असतात. तुळस ही अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी म्हणूनही काम करते.
ब्लडप्रेशर नियंत्रणायेतं
सकाळी उठल्यावर एक कप तुळशीचा चहा प्यायल्यास ब्लडप्रेशर नियंत्रित राहायला मदत होते. तुळशीमध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटी हायपरटेन्सिव्हमुळे रक्तदाब कमी होतो. जर तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास असेल सकाळी तुळशीचा चहा पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
लठ्ठपणा कमी होतो
जे लोक लठ्ठ आहेत त्यांच्यासाठी तुळशीचा चहा अमृततुल्य आहे. तुळशीत असलेल्या फायबर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. त्यामुळे तुळशीचा चहा प्यायल्याने लठ्ठपणा सहज कमी करता येतो.
तणाव दूर होतो
तुम्ही मानसिक तणावात असाल तर रोज सकाळी तुळशीचा चहा प्या. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-स्ट्रेसमुळे ताण दूर होतो. सकाळी तुळशीचा चहा प्यायल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील.
advertisement
पचन सुधारतं
सकाळी तुळशीचा चहा प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. तुळशीच्या चहामध्ये असलेले फायबर पचनाच्या अनेक समस्यांना दूर करते.
चांगली झोप
तुळशीमध्ये अँटी-डिप्रेशन आणि अँटी-स्ट्रेस गुणधर्म आढळतात ज्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होते आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement