मुंबईच्या झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या फिजिओथेरपिस्ट धारा पारेख यांनी न्यूज18 ला सांगितले की, “मसल्स आणि जॉइंट्स गतिशील करण्यासाठी फिजिओथेरपीमध्ये विविध प्रकारचे व्यायाम आणि टेक्निक वापरले जाऊ शकतात. शारीरिक समस्यांचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, फिजिओथेरपीमध्ये मानसिक आधार देखील दिला जातो, ज्यामुळे रुग्णाला वेदना आणि इतर समस्यांना सामोरे जाण्यास मदत करता येते. फिजिओथेरपिस्ट रुग्णांना त्यांच्या आरोग्य देखरेखीविषयी माहिती देतात आणि त्यांना बरे होण्यास मदत करतात. फिजिओथेरपी पेन मॅनेजमेंटमध्ये खूप प्रभावी ठरू शकते. या थेरपीमुळे हाडांच्या आणि सांध्याच्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.”
advertisement
तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? हे 5 घरगुती उपाय ट्राय कराच
ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी खूप प्रभावी धारा पारेख यांनी सांगितले की, “ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये हाडे कमकुवत होतात आणि चालतानाही मोडू शकतात. या आजाराच्या रुग्णांसाठी फिजिओथेरपी वरदान ठरू शकते. ऑस्टिओपोरोसिस व्यवस्थापनात फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते आणि हाडांची ताकद वाढवण्यास आणि शारीरिक संतुलन सुधारण्यास मदत करते. हाडांची झीज रोखण्यासाठी आणि हाडांची वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांसाठी फिजिओथेरपीची शिफारस केली जाते.”
प्रत्येक रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन थेरपी प्रोग्राम तयार केले जातात फिजिओथेरपिस्ट रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन थेरपी प्रोग्राम बनवतात आणि त्यांना रोग किंवा जखमांपासून बरे होण्यास मदत करतात. दुखापत किंवा सर्जरीनंतर फिजिओथेरपीमुळे शरीराची गतिशीलता आणि ताकद सुधारते. फिजिओथेरपीमुळे रुग्णांच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये सुधारणा होते. त्यामुळे रुग्णांना चालणे, बसणे आणि इतर कामे सहज करता येतात. कधीकधी यामुळे शस्त्रक्रियेची गरज कमी होते किंवा शस्त्रक्रिया टाळता येते. फिजिओथेरपीद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. वेदना कमी करणे आणि हालचाल सुधारणे यामुळे जीवन सोपे होऊ शकते.
