तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? हे 5 घरगुती उपाय ट्राय कराच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Mouth Ulcers Home Remedies: तुम्हालाही तोंड येण्याची समस्या होत असेल. पोटात उष्णता वाढल्याने किंवा कमी पाणी प्यायल्याने होऊ शकते. ही समस्या औषधं घेऊन बरी होऊ शकते. मात्र औषधांपूर्वी तुम्हाला घरगुती उपाय करून पाहिले पाहिजेत.
Mouth Ulcers Home Remedies: तुम्हालाही तोंडाच्या अल्सरचा त्रास होतो का? खाता-पिताना खूप तिखट लागतं का? बहुतेकांना उन्हाळ्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने तोंडात फोड येण्याची समस्या असते आणि त्यामुळे तुम्ही काही खाऊ किंवा पिऊ शकत नाही. जेव्हा फोड येतात तेव्हा बऱ्याचदा जळजळ होते. हे सहसा जीभ, हिरड्या, ओठ, तोंडाच्या आत किंवा घशात देखील होते. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर एकापेक्षा जास्त आजार होऊ लागतात.
तोंडात अल्सर होण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी काही गोष्टींमुळे याचा धोका वाढतो. त्या म्हणजे, तोंडात दुखापत होणे, पोटात उष्णता वाढणे आणि हार्मोनल चेंजचा समावेशही यात आहे. तोंडातील अल्सरची समस्या काही दिवसात बरी होते, परंतु समस्या आणखी वाढण्यापूर्वी काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. तोंड येणे खूप वेदनादायक असते आणि त्यामुळे खाण्यापिण्यात अडचण येते. आज आपण ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.
advertisement
हे काही घरगुती उपाय आहेत:
1. मीठ आणि लवंग
एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण काही वेळ तोंडात ठेवा आणि नंतर काढून टाका. यानंतर लवंग चघळावे. या घरगुती उपायाने तोंडाच्या फोडांपासून आराम मिळू शकतो.
2. हळद
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळा आणि गार्गल करा. यामुळे तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
3. मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तोंडाच्या फोडांवर मध लावा. यामुळे फोड लवकर बरे होतात.
4. बटाटा
बटाटा कापून त्याचा रस काढा. नंतर हा रस तोंडाच्या व्रणावर लावा. अल्सरच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
5. खोबरेल तेल
खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तोंडाच्या फोडांवर रोज थोडे खोबरेल तेल लावा. यामुळे फोडापासून लवकर आराम मिळू शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 06, 2024 11:09 AM IST









