साहित्य
- लसून
- तेल
- हळद
- चिकन
- मीठ चवीनुसार
- पाणी
- भाजलेला कांदा
- भाजलेलं खोबरं
- आलं
- कोथिंबर
- टोमॅटो
- तिखट, मसाला
- बेडगी मिरची पावडर
- कांदा लसून चटणी
चिकन शिजवण्याची पद्धत
मंद आचेवर कुकर ठेवून त्यात तेल घाला. यानंतर त्यात थोडा लसून आणि हळद घाला.
advertisement
यानंतर त्यात चिकन घाला. यानंतर त्यात चवीनुसार खडेमीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. यानंतर हे चिकण एक ते दोन शिट्ट्या घेऊन व्यवस्थित शिजवून घ्या. तुम्ही पातेल्यात देखील ते शिजवू शकता.
वाटण तयार करण्याची पद्धत
दुसरीकडे एक वाटण तयार करा. यासाठी कांदा आणि कोबरं भाजून घ्या. सोबतच लसून, आलं आणि कोथिंबिरी चिरून घ्या आणि त्याचे मसाला वाटण तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घेऊन त्यात तिखट, हळद घाला. त्यातच बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसून चटणी घ्याला. यानंततर त्यात आपण तयार केलेलं वाटण घाला आणि ते छान भाजून घ्या. या मसाल्याचे दोन भाग करा. एक भाग सुकं चिकनसाठी आणि एक भाग रस्सा चिकनसाठी वापरा.
रस्सा चिकन बनवण्याची पद्धत
आता एक कुकरमध्ये तेल आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला. आता यात अर्धे चिकनपिस आणि आपण बनवलेल्या मसाल्याचा अर्धाभाग घाला. यानंतर त्यात आवश्यकतेनुसार मीठ घाला, कारण आपण आधी थोडं मीठ घातलं होतं.आता त्यात तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला आणि शिजवून घ्या. त्याला कांळा किंवा तांबडा असा रंग येईल.
सुकं चिकन बनवण्याची पद्धत
आता एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबिरी घाला. याच मिश्रणनात थोडं मीठ घालून चांगलं परतून घ्या. टोमॅटो हलका भाजला की त्यात आपण तयार केलेला अर्धा मसाला घाला. सगळं चांगलं मिक्स करून घ्या आणि त्यात उरलेले चिकनपिस घाला. हे सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि त्यात आपण बनवलेल्या रस्सा चिकनचा पळीभर रस्सा घालून शिजवून घ्या आणि त्यावर थोडी कोथिंबिर चिरून टाका. तुमचं सुक्क चिकन देखील तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
