हनुमानाची गदा केवळ एक शस्त्र नाही तर ती त्यांच्या भक्तांसाठी एक संरक्षक कवच देखील आहे. असं मानलं जातं की जो कोणी भक्त खऱ्या मनाने हनुमानजीची पूजा करतो त्याचे रक्षण स्वतः बजरंगबली करतात. हनुमान नेहमी त्याची गदा डाव्या हातात धरतो म्हणून त्याला 'वामहस्तगदायुक्तम्' असंही म्हणतात. ज्याचा अर्थ 'डाव्या हातात गदा धरणारा' असा होतो. या गदाला 'कौमोदकी' असेही म्हणतात. 'कौमोदकी' म्हणजे 'मनाला मोहित करणारी'.
advertisement
Mahabharat : महाभारत युद्धात मृत्यूनंतर शकुनी मामाच्या त्या मायावी फाशांचं काय झालं, ते कुठे गेले?
पौराणिक कथेनुसार, हनुमानजींची गदा त्यांना धनदेवता कुबेराने भेट म्हणून दिली होती. यक्षांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कुबेर हा देवांचा खजिनदार आहे आणि त्याला संपत्तीचा स्वामी मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, हनुमान लहान असताना, त्याच्या अद्भुत शक्ती आणि भक्तीने प्रभावित होऊन कुबेराने त्याला ही गदा भेट दिली. हनुमानाला ही गदा देताना कुबेरने त्याला आशीर्वाद दिला की या गदाने तो प्रत्येक युद्धात विजयी होईल. या वरदानामुळे हनुमानाची गदा आणखी शक्तिशाली आणि महत्त्वाची बनली.
काही कथांमध्ये असंही नमूद आहे की ही गदा प्रत्यक्षात भगवान विष्णूची आहे, ज्याचा एक भाग कुबेराने हनुमानाला भेट म्हणून दिला होता. अशाप्रकारे ही गदा केवळ कुबेराची देणगी नाही तर त्यात भगवान विष्णूच्या शक्तीचा एक भागदेखील आहे.
Ramayan : रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामाला दिव्यास्त्र कसं मिळालं होतं, कुणी दिलं होतं?
अशाप्रकारे हनुमानाची गदा केवळ त्याच्या शारीरिक शक्तीचं प्रतीक नाही तर ती कुबेराच्या आशीर्वादाचं आणि भगवान विष्णूच्या कृपेचंदेखील प्रतीक आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची पुष्टी करत नाही किंवा याचं समर्थन करत नाही. तसंच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)