TRENDING:

Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची कारणं शोधा, मगच उपचार करा, त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की वाचा

Last Updated:

चेहऱ्यावर मुरुम येतात त्यामागे अनेक कारणं असतात. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे याविषयी माहिती दिली आहे. मुरुम किंवा पुरळ का येतं तसंच कोणत्या सवयींमुळे हे प्रमाण कमी होऊ शकतं याचा तपशील दिला आहे. या सवयी बदलल्यानं त्वचा चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चेहऱ्यावर विविध कारणांमुळे पुरळ किंवा फोड येतात. त्यावर लगेच औषध लावण्याआधी किंवा गोळ्या घेण्याआधी ही माहिती जरुर वाचा.
News18
News18
advertisement

चेहऱ्यावर मुरुम येतात त्यामागे अनेक कारणं असतात. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे याविषयी माहिती दिली आहे. मुरुम किंवा पुरळ का येतं तसंच कोणत्या सवयींमुळे हे प्रमाण कमी होऊ शकतं याचा तपशील दिला आहे. या सवयी बदलल्यानं त्वचा चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss : बाबा रामदेवांचा वेट लॉस मंत्रा, नक्की वापरुन पाहा, वजन कमी करा

advertisement

- ट्रिटमेंट पूर्ण करा.

चेहऱ्यावरचे मुरुम येतात ते बरे करण्यासाठी, आपल्या दिनचर्येत काही चुका आहेत ते एकदा तपासून पाहा. अनेकदा मुरुम घालवण्यासाठी ट्रिटमेंट केली जाते पण ती सलग पूर्ण केली जात नाही. उपचारांचे निकाल येण्यासाठी किमान चार ते सहा आठवडे लागतात, म्हणून कोणताही उपचार वगळू नका.

- टाळूची स्वच्छता.

नियमितपणे चेहरा स्वच्छ करताय पण केस आणि टाळू जर अस्वच्छ असेल तर टाळूमधे तेल तयार होतं. हे तेल कपाळावर आणि गालावर देखील पोहोचू शकतं. या तेलामुळे मुरुमं आणि फोड येण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून, नियमितपणे टाळू स्वच्छता करणं महत्वाचं आहे.

advertisement

Yogasana : हिवाळ्यात करा ही योगासनं, लवचिकता वाढवा, फिट राहा

- उशांचं कव्हर वेळेवर न बदलणं.

महिनोनमहिने उशांचं कव्हर बदलत नसाल तर मुरुम येण्याचं प्रमाण वाढणार. मुरुम टाळण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ दर दोन ते तीन दिवसांनी उशांचं कव्हर बदलण्याची शिफारस करतात. केसांमधून येणारं तेल उशीवर जातं, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणखी वाढतात.

advertisement

- योग्य क्लींजरचा वापर न करणं.

चेहऱ्यावरील घाण काढून टाकली जाईल पण त्वचा कोरडी होणार नाही अशा क्लीन्झरचा वापर करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ देतात. चुकीच्या क्लींजरमुळे त्वचा कोरडी होते.

- अयोग्य आहार.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबईतलं असं ठिकाणं वाटेल गोव्यात आल्यासारखं! ख्रिसमसला अख्खं गाव सजतं!
सर्व पहा

बरेच लोक फोडांवर उपचार सुरु करतात पण, आहार चुकीचा असतो. यासाठी साखर आणि दुग्धजन्य पदार्थ टाळणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक राहते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची कारणं शोधा, मगच उपचार करा, त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल