TRENDING:

भुलाबाईच्या खिरापतीसाठी बनवू शकता हे 5 पदार्थ, सोपी रेसिपी, नेमकं काय कराल?

Last Updated:

bhulabai festival in vidarbha - कोजागिरी पौर्णिमेलाही तुम्ही कोणालाही लवकर ओळखता न येणाऱ्या काही खिरापत बनवू शकता. या खिरापतींची नावे आणि रेसिपी आपण आज जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती - विदर्भामध्ये दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई उत्सव साजरा केला जातो. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करून त्याची 5 दिवस पूजा केली जाते. हा उत्सव लहान मुली व महिला साजरा करतात. यामध्ये एक विशेष म्हणजे दररोज घरोघरी जाऊन गाणे म्हटले जाते आणि शेवटी मग खिरापत बनवून ती प्रसाद म्हणून वाटली जाते.

advertisement

आज काय बनवलं असेल?, असे म्हणत ती खिरापत समोरच्यांना ओळखायची असते. कोजागिरी पौर्णिमेलाही तुम्ही कोणालाही लवकर ओळखता न येणाऱ्या काही खिरापत बनवू शकता. या खिरापतींची नावे आणि रेसिपी आपण आज जाणून घेऊयात.

1. शेवयांचा चिवडा

साहित्य : शेवया, शेंगदाणे, जिरे, मीठ, तिखट, कडीपत्ता, लिंबू, तेल, कांदा, टोमॅटो

कृती :- सर्वात आधी तेल, कांदा आणि बाकी साहित्य घालून फोडणी तयार करून घ्यावी आणि त्यात शेवया घालाव्या. त्यात शेवया लाल होतपर्यंत भाजून घ्याव्या. शेवया कुरकुरीत झाल्या की त्यावर लिंबू आणि थोडी साखर घालावी आणि अशाप्रकारे शेवयांचा चिवडा तयार होईल.

advertisement

2. तिखट सरगुंडे

साहित्य :- सरगुंडे, जिरे, मीठ, तिखट, कडीपत्ता, तेल, कांदा, टोमॅटो

कृती :- सर्वात साधी कांदा, जिरे आणि इतर साहित्य घालून फोडणी तयार करावी. त्यात थोडे पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात सरगुंडे घालून ते मॅगीसारखे शिजवून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर घालून सरगुंडे खाण्यासाठी तयार होतात.

3. पापड भेल -

advertisement

साहित्य :- बटाटा चिप्स, मुगाचे पापड, पिंगर, बटाटा पापड, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, कांदा, टोमॅटो

कृती :- सर्व पापड तळून बारीक करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ, चाट मसाला घालावे. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पापड भेल तयार होईल.

4. मूग डाळ -

advertisement

साहित्य :- मूग डाळ, मीठ, तेल

कृती :- मूगाची डाळ 2 तास भिजत घालायची. नंतर त्याची साल काढून घ्यायची आणि त्यात मीठ घालावे. त्यानंतर ती डाळ तळून घ्यावी. तळून काढण्यासाठी झारा वापरा, म्हणजे त्यात तेल राहणार नाही. त्यात तुम्ही चाट मसाला, लाल तिखट सुद्धा घालू शकता. अशाप्रकारे डाळ खाण्यासाठी तयार होईल.

5. गोड पिठी

साहित्य:- अर्धी वाटी रवा, 1 वाटी गव्हाचे पीठ, वेलची पूड, पिठी साखर, तूप

कृती :- सर्वात आधी रवा आणि गव्हाचे पीठ तुपात छान लाल भाजून घ्यावे. ते भाजून घेतल्यावर थोड गार होऊ द्यावे. नंतर त्यात साखर घालायची. वेलची पूड घालायची. गोड पिठी खाण्यासाठी तयार होईल. तर अशाप्रकारे कोजागिरी पौर्णिमेला हे 5 पदार्थ खिरापत म्हणून बनवू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
भुलाबाईच्या खिरापतीसाठी बनवू शकता हे 5 पदार्थ, सोपी रेसिपी, नेमकं काय कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल