हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : हरभऱ्याची भाजी - 250 ग्रॅम लसूण - 10-15 पाकळ्या आले - 1 इंच हिरवी मिरची - 2-3 टॉमॅटो - 2 देशी तूप मोहरीचे तेल बेसन मीठ, हिंग, धणे पूड, तिखट
हरभऱ्याची भाजी कसा बनवायची? : सर्वप्रथम चणा साग स्वच्छ धुवून बारीक चिरा. पातेल्यात पाणी उकळून, त्यात भाजी घालून मऊ होईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये ढवळत रहा आणि साग थोडासा कुस्करून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये थोडं बेसन परतून शिजलेल्या सागात मिसळा.
advertisement
फोडणी तयार करा आणि साग शिजवा : एका पॅनमध्ये मोहरीचं तेल गरम करून लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि हिंग परता. त्यानंतर त्यात चिरलेले टॉमॅटो, धणे पूड, आणि तिखट घालून शिजवा. ही तयार फोडणी सागात घालून नीट ढवळा आणि थोडा वेळ शिजवा.
चपाती किंवा बाजरी भाकरीसोबत खा : गॅस बंद करण्याआधी सागाला देशी तुपाची फोडणी द्या. गरमागरम साग बाजरी किंवा मका भाकरीसोबत खा. चव वाढवण्यासाठी सोबत गूळ खा. साग जर आंबट असेल तर टॉमॅटो वगळू शकता आणि तिखटाची मात्रा आपल्या चवीनुसार कमी-जास्त करा.
हे ही वाचा : Dairy Farming : तुम्ही दूध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? मग या पद्धतीने करा संपूर्ण नियोजन
हे ही वाचा : प्रॉन्स कोळीवाडा ते चिकनवडा थाळी, डोंबिवलीतील भरलाय आगरी महोत्सव, 100 रुपयांपासून झणझणीत पदार्थांची मेजवानी