लाल कोरफड खरंच अस्तित्वात आहे का ?
अनेकांना आश्चर्यसुद्धा वाटू शकतं की लाल रंगाची कोरफड खरच अस्तित्वात आहे का ? लाल कोरफड ही एक दुर्मिळ प्रजाती आहे, ज्यामध्ये हिरव्या कोरफडीपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. लाल कोरफड ही अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध आहे. जाणून घेऊयात लाल कोरफडीच्या फायद्यांबद्दल...
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती वाढते :
लाल कोरफडीत असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक वाढते. याशिवाय लाल कोरफड बद्धकोष्ठता, आम्लता आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. लाल कोरफड पचन सुधारून पोटाशी संबंधित समस्या कमी करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लाल कोरफडीचा रस घेतल्याने शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते. कोरफडीच्या रसात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्यास अधिक फायदे होतात.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची लाल कोरफड:
लाल कोरफडीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचा तजेलदार ठेवून त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. कोरफडीतले घटक त्वचेला खोलवर पोषण देतात आणि नैसर्गिकरित्या ओलावा टिकवून ठेवतात. लाल कोरफडीच्या नियमित वापराने त्वचा उजळते आणि डाग दूर होतात. लाल कोरफडीच्या नियमित वापराने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर :
लाल कोरफड ही केसांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याची मानली जाते. यामुळे टाळूला पोषण मिळून कोंड्याची समस्या दूर होते. लाल कोरफडीमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक येते. लाल कोरफडीचे जेल नारळाच्या तेलात मिसळून केसांच्या मुळांवर लावल्यास केस झडण्याची समस्या कमी होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त :
लाल कोरफड शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते. कोरफडीच्या नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. लाल कोरफड कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयरोगांचा धोका कमी होतो.लाल कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे दुखापत, चिडचिड किंवा सूज कमी करण्यास मदत करतात. ते प्रभावित भागावर लावल्याने जखम जलद बरी होण्यास मदत होते.
डायबिटीसवर गुणकारी लाल कोरफड :
लाल कोरफडचा गर खाल्ल्याने किंवा ज्यूस प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. कोरफडीत असलेले घटक इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.