घरी दही बनवणं हा कधीही चांगला पर्याय आहे. कारण घरचं दही शुद्ध आणि चांगलं असतं. दही बनवण्यासाठी बहुतांश लोक काचेच्या भांड्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहितीये का? मातीच्या भांड्यात दही लावल्याने ते जास्त फायदेशीर बनतं. हे आम्ही नाही स्वतः डायटिशियन सांगता आहेत. सर्टिफाईड डायटिशियन चरणप्रीत यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली दिली आहे.
advertisement
मातीच्या भांड्यात दही लावण्याचे फायदे..
- चरणप्रीत यांच्यामते, मातीच्या भांड्यात दही लावल्याने त्याला पूर्णपणे नवीन चव मिळते आणि त्याचे फायदेही कैकपट वाढतात. मातीच्या भांड्यात लावलेल्या दह्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे वाढतात.
- मातीच्या भांड्यात दही लावल्याने प्रोबायोटिक्सचे प्रमाण वाढते. मातीची भांडी फायदेशीर जिवाणूंच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण निर्माण करतात. ज्यामुळे दही प्रोबायोटिक्स समृद्ध बनते.
- मातीच्या भांड्याचे अल्कधर्मी गुणधर्म दह्यातील ॲसिडिटी संतुलित करतात. यामुळे मातीच्या भांड्यातील दही आपल्या पोटासाठी अधिक सौम्य बनते आणि आपली पचनशक्ती सुधारते.
- मातीच्या भांड्यांची उष्णता साठवून ठेवण्याची म्हणजेच हिट रिटेन्शनची क्षमता खूप चांगली असते. ज्यामुळे मातीच्या भांड्यात तयार झालेले दही हे अधिक मलईदार बनते आणि खूप घट्टही बनते.
- मातीच्या भांड्याचं वैशिष्ठय म्हणजे, मातीचा सुखद गंध आणि चव. मातीचं भांडं दह्याला एक अनोखी, नैसर्गिक चव देतं, ज्यामुळे दह्याच्या प्रत्येक घासाला एक सुखद सुगंध आणि अद्भुत चव येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
