TRENDING:

Pickle impact on Health : लग्नानंतर लोणचं खाणं धोक्याचं, मूल होण्यात अडथळा ठरतं?

Last Updated:

खरं तर लग्नानंतर पुरुषांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. परंतु धावपळ व जबाबदारीमुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करणं अनेकांना जमत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लोणच्याचं नुसतं नाव जरी घेतलं, तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटकदार चवीमुळे हा पदार्थ परत परत खावासा वाटतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, पुरुषांनी जर लोणच्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं, तर त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यातही लग्न झालेल्या पुरुषांनी लोणचं जास्त खाऊ नये.
लोणचं खाण्याचे दुष्परिणाम
लोणचं खाण्याचे दुष्परिणाम
advertisement

खरं तर लग्नानंतर पुरुषांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. परंतु धावपळ व जबाबदारीमुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करणं अनेकांना जमत नाही. बऱ्याच जणांना तर लग्नानंतर अचानक वाढलेल्या जबाबदारीमुळे, धावपळीमुळे शारीरिकदृष्ट्या अशक्त वाटू लागतं. अशा परिस्थितीत पुरुषांनी त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असणारे पदार्थ खाणं टाळले पाहिजे. असाच एक पदार्थ म्हणजे लोणचं. महिलांना जास्त आंबट पदार्थ खायला आवडतात, असं म्हटलं जातं. पण पुरुष देखील या बाबतीत मागे नसतात. बहुतांश पुरूषांना जेवणासोबत लोणचं खायला आवडतं. मात्र लोणचं जास्त खाल्ल्यानं त्यांचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

advertisement

लोणचं खाण्याचे दुष्परिणाम

आंब्याच्या लोणच्यामध्ये ॲसिटामिप्रिड नावाचा घटक आढळतो, ज्याचा पुरुषांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामध्ये असलेले प्रीझर्व्हेटिव्हदेखील आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे पुरुषांनी आंबट पदार्थ शक्यतो कमीच खावेत. याबाबत न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, ‘अनेकांना पराठा, भात किंवा खिचडीसोबत आंबट लोणचं खायला आवडतं. यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते. परंतु लोणच्यामध्ये असे अनेक घटक आढळतात, जे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमकुवत होऊ शकते. शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता देखील प्रभावित होऊ शकते.’

advertisement

तेलाचे प्रमाण असते जास्त

आजकाल मार्केटमध्ये लोणच्याचे विविध प्रकार मिळतात. परंतु मार्केटमध्ये मिळणाऱ्या लोणच्यात वापरण्यात येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांना आवश्यक तेवढं ऊन दिलेलं नसतं. त्यामुळे बऱ्याचदा ते कच्चे राहतात. तसंच लोणचं तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात तेल वापरण्यात येतं, व हे तेल कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे शक्यतो मार्केटमधील लोणचं जास्त प्रमाणात खाणं हे पुरुषांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत मार्केटमधील लोणचं खाणं टाळणं, हा आरोग्याच्या दृष्टिने उत्तम पर्याय होऊ शकतो.

advertisement

दरम्यान, आजच्या काळात प्रत्येकाची धावपळ वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकचे महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

(इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pickle impact on Health : लग्नानंतर लोणचं खाणं धोक्याचं, मूल होण्यात अडथळा ठरतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल