TRENDING:

Cancer Tips : तुम्ही फक्त या 6 सवयी लावून घ्या, कधीच होणार नाही कॅन्सर! स्पेशालिस्टचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

कधी शारीरिक बदलामुळे कॅन्सर होतो, तर कधी आपल्या अस्वस्थ जीवनशैलीचाही यावर परिणाम होतो. म्हणूनच आपण असं करावं, ज्याने कॅन्सर आपल्यापासून दूर राहील. हे जाणून घेणं आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कॅन्सरचं नाव ऐकलं की जवळपास सर्वांच्याच मनात भीती दाटते. हल्ली कॅन्सरच्या रुग्णाचं प्रमाणही खूप वाढत आहे. कॅन्सर होण्याची अनेक कारण असतात. कधी शारीरिक बदलामुळे तर कधी आपल्या अस्वस्थ जीवनशैलीचाही यावर परिणाम होतो. म्हणूनच आपण असं करावं, ज्याने कॅन्सर आपल्यापासून दूर राहील. हे जाणून घेणं आवश्यक आहे.
कर्करोग कसा टाळावा
कर्करोग कसा टाळावा
advertisement

पॉडकास्टर राज शामानीच्या मुलाखतीत डॉ. तरंग क्रिष्णा यांनी कॅन्सरबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सहा सवयीसांगितल्या आहेत, ज्यांचा तुम्ही अवलंब केलात तर तुम्ही कॅन्सर दूर ठेवू शकता. त्यांनी याला MEDSRX असं नाव दिलं आहे. MEDSRX यातल्या प्रत्येक अक्षराचा एक वेगळा अर्थ आहे.

या सवयी आत्तापासूनच लावून घ्या..

- सर्वात आधी आहे M म्हणजेच मेडिटेशन ध्यान. मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो. तणाव दीर्घकालीन दाह आणि इम्युनिटी कमी करतो. कॉर्टिसोलसारखे तणाव संप्रेरक कर्करोगाच्या वाढीस चालना देऊ शकतात. म्हणूनच तणाव आणि कॉर्टिसॉल हार्मोनची वाढ रोखण्यासाठी रोज मेडिटेशन करण्याची सवय लावा.

advertisement

- E म्हणजेच एक्सरसाइज. व्यायाम केल्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि जास्तीचे वजन कमी होते. व्यायाम केल्याने हे फायदे होतात अन्यथा हे सर्व कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतात. योग, जलद चालणे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असे व्यायाम शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि हार्मोन बॅलेन्स करण्यास मदत करतात.

- D म्हणजेच डाएट. कॅन्सर रोखण्यास तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेला स्वच्छ, वनस्पती-आधारित आहार फ्री रॅडिकल्सशी लढतो आणि दाह कमी करतो. लाल मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. हे टाळल्यास कॅन्सरचा धोका आणखी कमी होईल.

advertisement

- S म्हणजे स्लिप. शरीरातील पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी झोप आवश्यक आहे. अपुरी झोप मेलाटोनिनच्या निर्मितीमध्ये अडथळा आणते. यामुळे सर्वच कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा होण्याची शक्यता जास्त असते.

- R म्हणजे रिलेशनशिप. नातेसंबंध आणि मेंटल हेल्थ यांचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो. चांगले सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आनंद वाढवतात आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देतात. यामुळं शरीर आजारांना कमी बळी पडतं आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

advertisement

- X म्हणजे एक्स फॅक्टर. 'द एक्स फॅक्टर' म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी करणे, तणाव कमी करणे आणि सकारात्मक मानसिकता राखणे. या सर्व गोष्टी कराव्या. यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, जे आपसूकच कॅन्सरचा धोका कमी करतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer Tips : तुम्ही फक्त या 6 सवयी लावून घ्या, कधीच होणार नाही कॅन्सर! स्पेशालिस्टचा महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल