उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळं अनेकदा चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडते. यावर उपाय म्हणून लोक विविध क्रीम आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु तुम्ही ते न वापरता घरीच नैसर्गिकरित्याही एक जेल तयार करून त्याचा वापर करू शकता. जमुई येथील आयुष चिकित्सक डॉ. रस बिहारी तिवारी यांनी तुळशीच्या पानांचे जेल बनवून चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
advertisement
उन्हाळ्यात अशी घ्या चेहऱ्याची काळजी
तुळशीला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी, अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामळं तुम्हील बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनांऐवजी घरी बनवलेले तुळशीचे फेस जेल वापरू शकता. हे जेल नियमित वापरल्यास त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होते आणि चमकदा दिसू लागते. चेहऱ्यावरील मुरुम, डाग दूर होतात आणि तेलकट त्वचेची समस्याही कमी होते.
असं बनवा तुळशीच्या पानांचं जेल
हे जेल बनवणं अत्यंत सोपं आहे. डॉ. तिवारी यांनी तुळशीच्या पानांचं फेस जेल कसं बनवायचं हे देखील सांगितलंय. तुळशीचं फेस जेल बनवण्यासाठी सर्वप्रथम ताजी तुळशीची पानं स्वच्छ धुऊन, त्यांचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा कोरफडीचा गर आणि गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि एका स्वच्छ डब्यात साठवून ठेवा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे फेस जेल चेहऱ्यावर हळुवारपणे लावा आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं चेहरा व्यवस्थित धुवा. याचा नियमित वापर केल्यास त्वचेची चमक वाढते आणि हळूहळू डाग आणि मुरूम दूर होतात. हे जेल पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु ते वापरण्याआधी त्याची पॅच टेस्ट नक्की करा.
डॉ. तिवारी यांनी हे देखील स्पष्ट केलं की, हे तुळशीचे फेस जेल त्वचा स्वच्छ करण्यासोबत तिला हायड्रेटेड देखील ठेवते. याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात, तसेच त्वचेचं तारुण्य दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. परंतु संवेदनशील त्वचा असलेल्यांना वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करण्याचा सल्लाही डॉक्ट तिवारी यांनी दिला आहे. हा घरगुती उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केल्यास तो सर्वात प्रभावी ठरू शकतो असेही डॉ. रस बिहारी तिवारी यांनी सांगितले.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
