जसं ज्यूसचं नाव तर आगळंवेगळं आहे तसं त्याचे फायदेही अनेक आहेत. ACB ज्यूस या नावामुळे तुम्हाला 2 प्रश्न पडतील एक तर हा ज्यूस मिळेल कुठे? आणि हा किती महाग असेल. जाणून घेऊयात यांची उत्तरं
ACB ज्यूस म्हणजे सफरचंद (Apple), गाजर(carrot), बीट(beet root) एकत्र करून बनवलेला ज्यूस. हा ज्यूस तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता.
advertisement
ACB ज्यूसचे फायदे काय?
सफरचंद
सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट् असतात जे आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायद्याचे असतात. सफरचंद वजन कमी करण्यासोबतच कर्करोग, हृदयविकार, दमा आणि पचन यांसह मोठ्या आजारांनाही दूर ठेवतात.
गाजर
गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. गाजरामुळे दृष्टीदोष दूर होतो. गाजर रक्तातली साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो. त्यामुळे डायबिटीस आणि हृदविकारांचा धोका दूर होतो. गाजरामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
बीट
बीट हे विविध जीवनसत्त्वं,खनिजं प्रथिनं, हेल्दी फॅट्स, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर यांचा उत्कृष्ट स्रोत आहे.बीट हे रक्तवाढीसाठी पोषक आहे, त्याशिवाय बीटचा त्वचेलाही फायदा होतो.
ACB ज्यूस बनवायचा कसा ?
सुरूवातीला सफरचंद, बीटरूट, गाजर स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करा किंवा त्यांचा किस करा. त्यानंतर ते ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस बनवा. गरजेनुसार त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ किंवा मध खालून तुमच्या आवडीचा खट्टामिट्टा ACB ज्यूस बनवा. शोभेसाठी आणि अधिक फायद्यासाठी तुम्ही यावर कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं घालू शकता.
