माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लोण्याचा वापर व्हाइट सॉस किंवा बेचेमेलसारखे इन्स्टंट सॉस बनवण्यासाठी केला जातो. भाजीपाला आणि मासे, कोळंबी आणि खेकडे यांसारखे झटपट शिजणारे पदार्थ बनवताना लोणी हा एक उत्तम पर्याय आहे. लोण्यामुळे मांसाला चांगली चव येते. लसूण आणि इतर सीझनिंगमध्ये लोणी मिसळल्यानंतर चव आणखी चांगली होते; पण त्याचा अतिरिक्त वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो, हेही खरं आहे.
advertisement
हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक : लोण्याचा सॅच्युरेटेड फॅट्समध्ये समावेश होतो. लोण्यामुळे शरीरातल्या सॅच्युरेटेड फॅट्ससह एलडीएल कोलेस्टेरॉल (खराब कोलेस्टेरॉल) वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात लोणी खाल्ल्यास हृदयविकार होऊ शकतात.
काळे मनुके खाण्याचे हे 10 फायदे माहितीये? संपूर्ण आरोग्यासाठी आहे लाभदायक
कोलेस्टेरॉल लेव्हल वाढते : लोण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. एक चमचा लोण्यामध्ये सुमारे सात ग्रॅम फॅट असतं. हे प्रमाण आपल्या दैनंदिन गरजांच्या एक तृतीयांश आहे. अशा स्थितीत जास्त प्रमाणात लोणी खाल्ल्याने एलडीएल आणि एचडीएल कोलेस्टेरॉल वाढतं. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्ताच्या गाठी, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
लठ्ठपणासाठी कारणीभूत : एक चमचा लोण्यामध्ये 100पेक्षा जास्त कॅलरीज असतात. यातल्या बहुतांशी कॅलरीज सॅच्युरेटेड फॅट्समधून येतात. जास्त कॅलरीजमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. लठ्ठपणामुळे हार्ट डिसीज, डायबेटीस आणि कॅन्सरचे काही प्रकार होऊ शकतात.
अल्झायमर आणि डिमेन्शियाचा धोका वाढतो : 'करंट अल्झायमर रिसर्च' या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2018मधल्या रिसर्चनुसार, लोण्यासारखे सॅच्युरेटेड फॅट्स खाल्ल्याने अल्झायमर आणि डिमेन्शिया होण्याची शक्यता अनुक्रमे 39 टक्के आणि 105 टक्के वाढते.
रिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे हे फायदे माहित आहे? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेस्ट
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
