TRENDING:

फक्त 180 रुपयांत खरेदी करा मेन्स कुर्ता, मुंबईतील हे मार्केट माहितीये का? Video

Last Updated:

आपणही कॉटनचे कुर्ते खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मार्केट आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. याठिकाणी अगदी स्वस्तात मस्त कुर्ते मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लतिका तेजाळे, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या काळात कामासाठी बाहेर पडलेल्या मंडळींना उष्णता आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा उकाडा आणि घामामुळं हैराण व्हायला होतं. तेव्हा अंगावर कॉटनचे मऊसूत कपडे असल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे अनेक पुरुष उन्हाळ्याच्या दिवसांत कॉटनचे कुर्ते, कॉटनचे शर्ट, टीशर्ट परिधान करण्यास प्राधान्य देतात. आपणही कॉटनचे कुर्ते खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मार्केट आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. याठिकाणी अगदी स्वस्तात मस्त कुर्ते मिळतात.

advertisement

कुठे कराल खरेदी?

दादर जनता मार्केटमधे असलेले वी.आर.बी कलेक्शन येथे पुरुषांचे अनेक व्हरायटीचे कपडे मिळतात. या ठिकाणी पुरुषांचे शर्ट, टीशर्ट, कॉटन कुर्ता, शॉर्ट कुर्ता, फॅन्सी कुर्ता पजामा आदी पर्याय मिळतात. हे दुकान होलसेल असून या ठिकाणी मिळणाऱ्या मेन्स कुर्तींची किंमत ही 180 रुपयांपासून सुरू होते. अतिशय स्वस्तात सुंदर क्वालिटीचे कुर्ते ते खरेदीदारांना गेल्या 20 वर्षांपासून विकत आहेत.

advertisement

उन्हाळ्यात महिलांची असते गाऊनला अधिक पसंती; फक्त 65 रूपयांत करा व्यवसायासाठी 'इथं' खरेदी Video

500 रुपयांचा कुर्ता फक्त 180 रुपयांत

मेन्स कुर्त्यांचे रिटेल बाजारभाव हे 500 ते 600 रुपये आहेत. परंतु या ठिकाणी फक्त 180 ते 200 रुपयांत पुरुषांचे विविध प्रकारचे कुर्ते मिळतात. सोबतच स्वस्त दरात पुरुषांचे ब्रँडेड शर्ट, पँट आदी पर्याय या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दुकानाचे मालक विष्णू भाटिया यांनी सांगितले.

advertisement

दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कपड्यांचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दादरमधील होलसेल मार्केट आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी विविध कपडे अगदी स्वस्तात मिळतात. येथून खरेदी करून आपण चांगला नफा मिळवू शकता. पुरुषांची कुर्ती आणि इतर कपड्यांचा व्यवसाय करण्याचा विचार असेल तर जनता मार्केटमधील हे दुकान चांगला पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 180 रुपयांत खरेदी करा मेन्स कुर्ता, मुंबईतील हे मार्केट माहितीये का? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल