TRENDING:

Summer Tips : उन्हाळ्यातही गरम पाण्याने अंघोळ करताय? आत्ताच थांबवा, ठरू शकतं जीवघेणं..

Last Updated:

हिवाळा किंवा पावसाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्यास हरकत नाही. परंतु उन्हाळ्यातही अराम पाण्याने अंघोळ केली तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अंघोळ करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असत. मात्र काही लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते. ऋतू कोणताही असो हे लोक गरम पाण्यानेच अंघोळ करतात. हिवाळा किंवा पावसाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्यास हरकत नाही. परंतु उन्हाळ्यातही अराम पाण्याने अंघोळ केली तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.
News18
News18
advertisement

काहीवेळा लोक दुपारच्यावेळी अंघोळ करतात तेव्हा त्यांनी पाणी तापवून घेतले नाही तरीदेखील टाकीतले पाणी बऱ्यापैकी गरम असते. याचाही आपल्याला त्रास होऊ शकतो. रोज अशा गरम पाण्याने अंघोळ केल्यास तुम्ही काही भयानक आजारांना बळी पडू शकता. चला पाहूया गरम पाण्याने अंघोळ केल्याने नेमके काय होते आणि हे कोणत्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.

advertisement

सर गंगा राम हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील अंतर्गत औषध विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. एम वाली म्हणतात, 'आजकाल नळातून येणारे गरम पाणी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. उन्हाळ्यात, नळांमधून येणारे पाणी इतके गरम होते की, त्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. हे पाणी रात्रभर टाक्यांमध्ये भरले तरी थंड होत नाही. त्याचे आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात.

advertisement

घरच्या घरी असं बनवा कोकम आगळ; नियमित प्या, होतील हे जबरदस्त फायदे..

गरम पाण्याचे असे गंभीर नुकसान आहेत.

- या पाण्याने चेहरा धुतल्यास किंवा आंघोळ केल्यास केस गळण्याचा धोका असतो.

- चेहऱ्याच्या त्वचेत रंगद्रव्य येऊ शकते. त्वचा जळू शकते.

- नाकात पाणी शिरल्याने जळजळ होऊ शकते. नाकातील श्लेष्मल त्वचा जळू शकते.

advertisement

- गरम पाणी कानात गेल्यास मेण वितळते. त्यामुळे ते पसरते आणि आत जाते. यामुळे कान दुखणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

- या पाण्याने आंघोळ केल्याने विशेषत: महिलांमध्ये मासिक पाळीचे विकार होऊ शकतात.

- असे गरम पाणी तुम्ही शौचालयात सतत वापरत राहिल्यास पाईल्स, फिशर इत्यादी होऊ शकतात.

- गरम पाण्याच्या वापरामुळे लघवीला वारंवार संसर्ग होऊ शकतो. लघवी करताना जळजळ होऊ शकते. विशेषतः महिलांनी उन्हाळ्यात गुप्तांगांना जास्त गरम पाण्याचा स्पर्श होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.

advertisement

- अशा गरम पाण्याने आंघोळ केल्यावर अशक्तपणा येतो.

- या पाण्यात उष्णता असते आणि ते संपूर्ण यंत्रणेसाठी हानिकारक असते, त्यामुळे हात-पायांमध्ये जळजळ होऊ शकते. कोरडेपणा असू शकतो. कोरडी त्वचा येऊ शकते.

- यामुळे नखांचे नुकसान होऊ शकते. नखे ठिसूळ कोरडे होऊ शकतात.

- यामुळे मज्जातंतूंमध्येही गडबड होऊ शकते. काही वेळा या उष्णतेमुळे थकवा येणे किंवा इतर उष्णतेचे आजारही होऊ शकतात.

पुदिन्याचा वापर असाही होऊ शकतो? हे 5 उपयोग वाचून आश्चर्यचकित व्हाल!

गरम पाण्यासाठी लोकांनी कोणता उपाय करावा?

अशा गरम पाण्याने चेहरा अजिबात धुवू नका, असे डॉक्टर वाली सांगतात. त्याबरोबर आंघोळही करू नये. रात्री बाथरूममध्येच पाण्याने भरलेल्या दोन बादल्या ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळपर्यंत त्या थंड होतील, त्यानंतर या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता. कारण त्याचे तापमान 4-5 अंशांनी कमी होते. सकाळीसुद्धा थेट टाकीच्या नळातून किंवा शॉवरमधून आंघोळ करण्याऐवजी बादलीत पाणी भरून थोडे थंड झाल्यावर आंघोळ करावी. तापमान सामान्य करण्यासाठी आपण बादलीच्या पाण्यात रेफ्रिजरेटरचे पाणी घालू शकता आणि नंतर आंघोळ करू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यातही गरम पाण्याने अंघोळ करताय? आत्ताच थांबवा, ठरू शकतं जीवघेणं..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल