TRENDING:

Fatty Liver : भारतात वेगानं वाढतंय फॅटी लिव्हरचं प्रमाण, जाणून घेऊया कारणं आणि यापासून बचाव कसा करायचा ?

Last Updated:

भारतात फॅटी लिव्हरबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अलिकडच्या एका अभ्यासातून दिसून आलं की फॅटी लिव्हरचं प्रमाण भारतात वेगानं वाढतंय. या अभ्यासाला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असं नाव देण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यकृतात अतिरिक्त चरबी साचल्यामुळे होणारा विकार म्हणजे फॅटी लिव्हर. यामागे अनेक कारणं आहेत.
News18
News18
advertisement

अल्कोहोल पित नाही त्यामुळे यकृत पूर्णपणे सुरक्षित राहील, असं तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम काढा. भारतात फॅटी लिव्हरबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अलिकडच्या एका अभ्यासातून दिसून आलं की फॅटी लिव्हरचं प्रमाण भारतात वेगानं वाढतंय. या अभ्यासाला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असं नाव देण्यात आलं आहे.

advertisement

Obesity : लठ्ठपणामुळे वाढतो गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या कारणं आणि उपाय

मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीज म्हणजे, लठ्ठपणा, रक्तातली वाढलेली साखर, इन्सुलिन रेझिस्टन्स, खाण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैलीतले बदल आणि चयापचय विकार यामुळेही फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.

द लॅन्सेट रीजनल हेल्थ साउथईस्ट एशियाच्या अलीकडील अभ्यासात हे उघड झाल आहे. फेनोम इंडिया कोहोर्टमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, भारतातील अंदाजे 38.9% प्रौढांना फॅटी लिव्हर आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर फॅटी लिव्हरमुळे यकृत कडक होणं किंवा फायब्रोसिस होऊ शकतं.

advertisement

मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीज होण्यामागची कारणं -

लठ्ठपणा - भारतात वाढत्या लठ्ठपणाचं प्रमाण हे MASLD चं एक प्रमुख कारण आहे. आजकाल, कामामुळे प्रत्येकजण मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे पाहण्यात बराच वेळ घालवतो, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. त्याच वेळी, जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्यानं लठ्ठपणाही वाढतो, ज्याचा थेट परिणाम यकृतावर होतो.

advertisement

अन्न - बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयी देखील पूर्णपणे बदलल्या आहेत. आता आपण निरोगी पर्यायांपेक्षा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असलेलं फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ पसंत करतो. साखर, रिफाइंड पीठ आणि अस्वास्थ्यकर तेल जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानं यकृतातील चरबीचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकतं.

मधुमेह आणि इन्सुलिन रेझिस्टन्स - इन्सुलिन रेझिस्टन्स हे यकृताच्या नुकसानाचं एक प्रमुख कारण आहे. शरीराच्या पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत, तेव्हा शरीरातील चरबी साठवण्याऐवजी थेट यकृताकडे वाहून नेली जाते. म्हणूनच टाइप 2 मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या रुग्णांना फॅटी लिव्हरचा धोका सर्वाधिक असतो. यकृताच्या आरोग्यासाठी साखर नियंत्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

advertisement

फॅटी लिव्हर टाळण्यासाठी टिप्स

फॅटी लिव्हरसारख्या समस्या टाळण्यासाठी, निरोगी सवयी अत्यंत महत्वाच्या आहेत.

वजन नियंत्रित करा - फॅटी लिव्हर टाळण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवा. वजन वाढल्यानं यकृतात चरबी जमा होते. म्हणून, यकृताच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. यामुळे चयापचय देखील सुधारतं.

Weight Management : जिम, डाएट करुनही वजन कमी होत नाही ? समजून घ्या वजनाचं गणित

निरोगी आहार - फॅटी लिव्हरच्या समस्या टाळण्यासाठी, आहारात फळं, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्य यासारखे निरोगी पर्याय समाविष्ट करा. शिवाय, साखर, रिफाइंड पीठ आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळणं यकृतासाठी फायदेशीर आहे.

नियमित व्यायाम - दररोज व्यायाम केल्यानं इन्सुलिनचं कार्य सुधारतं आणि यकृतावरील चरबी कमी होते. म्हणून, दिनचर्येत शारीरिक हालचाली अवश्य करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर आजही पितात ब्रिटिशांनी उभारलेल्या वाड्यातून दूध, आजही आहे 1500 गायी-म्हशी
सर्व पहा

नियमित तपासणी - सुरुवातीच्या टप्प्यात रोगाचं निदान करण्यासाठी रक्तातील साखर आणि फायब्रोस्कॅन यासारख्या यकृताच्या चाचण्या करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatty Liver : भारतात वेगानं वाढतंय फॅटी लिव्हरचं प्रमाण, जाणून घेऊया कारणं आणि यापासून बचाव कसा करायचा ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल