TRENDING:

Chikungunya : मिश्र हवामानात या टिप्स लक्षात ठेवा, गंभीर आजारांचा वाढतो धोका, तापाकडे दुर्लक्ष नको, असू शकतात चिकुनगुनियाची लक्षणं

Last Updated:

डासांमुळे होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपैकी एक म्हणजे चिकुनगुनिया, ज्यामधे अनेकदा अचानक तीव्र ताप आणि असह्य सांधेदुखी होते. बरेच जण याला एक सामान्य विषाणूजन्य ताप समजून दुर्लक्ष करतात, पण असं करणं जीवघेणं ठरू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा आहे पण काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. त्यातच एप्रिल महिन्यात अजून पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. अशा मिश्र वातावरणात डासांचा उपद्रव प्रचंड वाढतो आणि त्यासोबतच अनेक धोकादायक आजारही उद्भवतात.
News18
News18
advertisement

डासांमुळे होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपैकी एक म्हणजे चिकुनगुनिया, ज्यामधे अनेकदा अचानक तीव्र ताप आणि असह्य सांधेदुखी होते. बरेच जण याला एक सामान्य विषाणूजन्य ताप समजून दुर्लक्ष करतात, पण असं करणं जीवघेणं ठरू शकतं.

Weight Loss : वजन कमी करायचं म्हणून जेवण टाळताय ? योग्य मार्गदर्शन घ्या अन्यथा वजन कमी होण्याऐवजी वाढतील तब्येतीच्या तक्रारी

advertisement

हा आजार डासांच्या चाव्यामुळे पसरतो आणि त्याची लक्षणं तीन ते सात दिवसांत दिसतात. चिकुनगुनियाचं लवकर निदान करून योग्य उपचार केले नाहीत, तर त्यामुळे दीर्घकाळ अशक्तपणा येऊ शकतो. म्हणून, त्याची लक्षणं समजून घेणं आणि खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अचानक येणारा तीव्र ताप

दोन्ही बाजूंच्या सांध्यांमधे तीव्र वेदना होणं आणि ताठरपणा येणं.

advertisement

शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवणं.

डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणं.

त्वचेवर पुरळ येणं.

तोंडात वाईट चव येणं अशी लक्षणं दिसू शकतात.

महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे होणारी सांधेदुखी दीर्घकाळ म्हणजे काहीवेळा काही महिन्यांपर्यंत टिकू शकते.

सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

नवजात बालकं

पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक

मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेले लोक

advertisement

या लोकांना लक्षणं दिसली, तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कधी सावध राहिलं पाहिजे?

ही गंभीर लक्षण दिसली तर, विलंब करू नका:

सतत उलट्या किंवा जुलाब होणं

चक्कर वाढणं आणि अशक्तपणा येणं

रक्ताशी संबंधित समस्या

Nose Bleeding : उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं ? त्वरित करता येणाऱ्या घरगुती उपायांविषयी जाणून घेऊया

advertisement

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय हे आपण जाणून असतो. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

घरात पाणी साचू देऊ नका.

मच्छरदाणीचा वापर करा.

पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

डास प्रतिबंधक क्रीम किंवा तेल लावा.

कडुलिंब, लेमनग्रास आणि दालचिनीच्या तेलाचा वापर करा.

आहार आणि घरगुती उपाय:

हलके, गरम आणि पौष्टिक पदार्थ खा.

अति तळलेले आणि थंड पदार्थ खाणं टाळा.

भरपूर पाणी प्या आणि विश्रांती घ्या.

गुळवेल, तुळस आणि कोथिंबीर यांसारखे आयुर्वेदिक उपाय फायदेशीर मानले जातात. अमृतारिष्ट, संजीवनी वटी आणि योगराज गुग्गुळ यांसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता.

उपचार :

बहुतेक रुग्ण एका आठवड्यात बरे होतात, पण सांधेदुखी कायम राहू शकते.

हलका व्यायाम आणि मालिश उपयुक्त ठरू शकतं.

खूप कामं करणं टाळा आणि विश्रांती घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

चिकुनगुनिया हा एक सामान्य ताप नाही. त्याची लक्षणं ओळखणं आणि वेळेवर उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडी सावधगिरी बाळगून आणि योग्य काळजी घेतली तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला या आजारापासून वाचवू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chikungunya : मिश्र हवामानात या टिप्स लक्षात ठेवा, गंभीर आजारांचा वाढतो धोका, तापाकडे दुर्लक्ष नको, असू शकतात चिकुनगुनियाची लक्षणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल