TRENDING:

Eye Care : डोळ्यांमधून खूप पाणी येतंय ? डोळे लाल का होतात ? समजून घ्या कारणं आणि उपचार

Last Updated:

काही वेळा अश्रूंचं अति उत्पादन झाल्यानं कधीकधी वस्तू पाहणंही कठीण होतं. काही वेळा डोळ्यातून खूप पाणी आल्यानं रोजची कामं करणं कठीण होऊ शकतं. डोळ्यातून पाणी येण्यामागे अनेक कारणं आहेत, ती समजून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ही माहिती आहे डोळ्यांबद्दलची. डोळे ओलसर ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या अश्रू तयार होत असतात. पण काही वेळा डोळ्यातून अचानक खूप पाणी येतं. असं तुम्हाला पण झालंय का ?
News18
News18
advertisement

काही वेळा अश्रूंचं अति उत्पादन झाल्यानं कधीकधी वस्तू पाहणंही कठीण होतं. काही वेळा डोळ्यातून खूप पाणी आल्यानं रोजची कामं करणं कठीण होऊ शकतं. डोळ्यातून पाणी येण्यामागे अनेक कारणं आहेत, ती समजून घेऊयात.

Skin Care : चेहऱ्यासाठी डिप क्लिनिंग का महत्त्वाचं ? चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाच्या आणि उपयुक्त टिप्स

advertisement

डोळ्यातून जास्त पाणी येण्याची काही कारणं समजून घेऊया. ऍलर्जी, डोळे कोरडे होणं, डोळे लाल होणं, डोळे आल्यानं पाणी येतं. अश्रू नलिका बंद होणं, डोळ्यावर मुरुम येणं यामुळे डोळ्यातून पाणी येतं. ही समस्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

मेकअप उत्पादनं - दर तीन ते सहा महिन्यांनी मस्कारा आणि आय शॅडो बदला. डोळ्यांचा मेकअप करताना, जुनी किंवा मुदत संपलेली उत्पादनं वापरणं टाळा. मेकअप लावण्याचं साहित्य पूर्णपणे स्वच्छ करा. याची काळजी योग्य प्रकारे न घेतल्यानं संसर्गाचा धोका वाढू शकतो किंवा डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या अधिकच गंभीर होऊ शकते.

advertisement

ॲलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळा - ॲलर्जी निर्माण करणाऱ्या आणि डोळ्यांतून जास्त पाणी येण्यामागे काही बाबी कारणीभूत ठरतात. धूळ, परागकण, धूर यामुळे ॲलर्जी येऊ शकते.

Blood Pressure : मीठ बदलल्यानं रक्तदाब नियंत्रित होतो का ? salt substitutes म्हणजे काय ?

डोळ्यांना विश्रांती द्या - डिजिटल उपकरणांच्या सततच्या वापरामुळे डोळे थकतात, ज्यामुळे डोळ्यांतून पाणी येतं आणि डोळे कोरडे पडतात. म्हणून, उपकरणं सतत वापरु नका.

advertisement

डोळे चोळू नका - डोळ्यांना सतत खाज येत असेल, तर त्याऐवजी त्यांना ओलसर ठेवण्यासाठी आय ड्रॉप्स वापरा. ​​कोरडे डोळे चोळल्यानं डोळ्यांमधलं पाणी वाढू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

डॉक्टरांचा सल्ला घ्या - डोळ्यांतून सतत पाणी येणं, डोळ्यांना वेदना होणं, डोळे लाल होणं, सूर्यप्रकाशात किंवा प्रकाशात गेल्यावर अस्वस्थता जाणवणं, डोळ्यांना सूज येणं, पापण्यांमधून स्राव येणं किंवा पापण्यांवर खपली धरणं या समस्या कायम राहिल्या तर, वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Care : डोळ्यांमधून खूप पाणी येतंय ? डोळे लाल का होतात ? समजून घ्या कारणं आणि उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल