पिवळे व कमकुवत दात
एनसीबीआयवरील (Ref) संशोधनानुसार, अनेक जण पिवळे झालेले दात स्वच्छ करण्यासाठी व्हाइटनिंग टूथपेस्ट वापरतात. या टूथपेस्टने रोज दात स्वच्छ केल्यास दातांचं नुकसान होऊ शकते. दात कमकुवत आणि पिवळे होऊ शकतात.
टीथ व्हाइटनिंग वापरावं की नाही?
दातांच्या इनॅमलचं होतं नुकसान
व्हाइटनिंग टूथपेस्टचा वापर दातांवरचे डाग व प्लेक हटवण्यासाठी केला जातो. अशा टूथपेस्टमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा कार्बामाइड पेरॉक्साइडसारखे ब्लीचिंग एजंट असतात. तसंच इतर अनेक गोष्टींचं मिश्रण करून ते बनवलं जातं. हे ब्लीचिंग एजंट दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे दात कमकुवत होतात आणि तुटतात. यामुळे दातांचं नॅचरल व्हाइटनिंग कमी होतं.
advertisement
मिनरल्सच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होतात
काहींचे दात मोत्यांसारखे चमकतात, तर काहींचे दात पिवळे किंवा पिवळसर असतात. दात चमकदार बनवण्यासाठी तुम्ही व्हाइटनिंग पेस्ट वापरत असाल, तर त्यामुळे दातांतले मिनरल्स कमी होतात. दात मजबूत ठेवण्यासाठी मिनरल्स आवश्यक आहेत. व्हाइटनिंग टूथपेस्ट जास्त वापरल्याने दात सेन्सिटिव्ह होऊ शकतात.
दात साफ करण्याची पद्धत
दात खूप घासल्याने पांढरे होतील असं तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. यामुळे दात खराब होतात. जास्त टूथपेस्ट वापरल्याने हिरड्यांत जळजळ होते. नेहमी सॉफ्ट ब्रश वापरावा आणि टंग क्लीनर वापरून तुम्ही ओरल हायजिन मेंटेन करू शकता.
डेंटिस्टच्या सल्ल्याने वापरा टूथपेस्ट
व्हाइटनिंग टूथपेस्ट नेहमी डेंटिस्टच्या सल्ल्याने वापरावी. दातांची तपासणी केल्यानंतर डॉक्टर तुमच्यासाठी योग्य टूथपेस्ट लिहून देतील. दात स्वच्छ ठेवण्यासाठी किमान ते दोनदा तीन-चार मिनिटं घासणं आवश्यक आहे. चांगल्या ओरल हेल्थसाठी तुम्ही योग्य डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. कॅफिनचं जास्त सेवन करू नयं व माउथ वॉशचा वापर करावा.
ज्या पेस्टमध्ये फ्लोराइडचं प्रमाण कमी असतं, ती पेस्ट दातांसाठी सुरक्षित मानली जाते. मोठ्यांच्या टूथपेस्टमध्ये 1350 पीपीएम फ्लोराइड असावं, तर लहान मुलांच्या पेस्टमध्ये फ्लोराइड 1000 पीपीएम असायला हवं. लहान मुलांना खूप कमी टूथपेस्ट द्यायला हवी.
