तुम्हालाही तुमच्या केसांना खास ट्रीटमेंट द्यायची असेल, तर तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य ओव्हरनाईट हेअर मास्क निवडा आणि मगच त्याचा वापर करा. तुमच्यासाठी कोणता ओव्हरनाईट हेअर मास्क सर्वोत्तम असू शकतो, हे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत, चला पाहूया..
केसांसाठी सर्वोत्तम ओव्हरनाईट हेअर मास्क..
फ्रीझी केसांसाठी वापर हा हेअर मास्क : तुमचे केस खूप कोरडे झाले असतील आणि तुटत असतील, तर तुम्ही केळी आणि मध वापरून तयार केलेला नाईट हेअर मास्क वापरला पाहिजे. या हेअर मास्कमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे केसांना मॉइश्चराइझ करतात आणि केसांना चमक देतात. हा मास्क बनवण्यासाठी 1 चमचा मध आणि एक केळी चांगली मिसळून घ्या. केस आणि टाळूवर लावून मसाज करा.
advertisement
खराब झालेल्या केसांसाठी वापरा हा हेअर मास्क : हेअर स्टाइलिंग, हीटिंग आणि केमिकल ट्रीटमेंटमुळे तुमचे केस खराब झाले असतील, तर तुमच्यासाठी नारळाचे तेल आणि कोरफड जेल वापरणे फायदेशीर ठरेल. हे केसांचे चांगले संरक्षण करतात आणि केसांमधील आर्द्रता परत आणतात. जीवनसत्त्वे, खनिजे, एन्झाईम्स, अँटिऑक्सिडंट्स, फॅटी ॲसिडने भरलेल्या या मास्कच्या वापरामुळे केसांमधील प्रोटीन परत मिळवण्यास आणि केस रिपेअर करण्यास मदत मिळते. हा मास्क बनवण्यासाठी अर्धा कप नारळाचे तेल कोमट करा आणि त्यात 3 चमचे कोरफड जेल घालून चांगले फेटून घ्या. आता हे मिश्रण हलक्या ओल्या केसांना लावा आणि सकाळी केस धुवा.
या गोष्टी लक्षात ठेवा..
- कधीही गुंता झालेल्या केसांना हेअर मास्क लावू नका. केस विंचरल्यानंतरच हेअर मास्क लावा.
- केसांना मास्क लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित कव्हर करा आणि हेअर कॅप नक्की घाला. उशीवर टॉवेल गुंडाळा.
- सकाळी कोमट पाण्याने 4 ते 5 वेळा केस स्वच्छ धुवा, जेणेकरून सर्व साहित्य सहज निघून जाईल.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.