किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या क्वीन मेरीच्या स्त्रीरोग रुग्णालयातील ओपीडीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही चिंताजनक बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की लठ्ठपणा आणि सतत जंकफूडचे सेवन केल्यास महिलांचे अंडाशय कमकुवत होत चालले आहे. यामुळे महिलांना गर्भधारणेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या ओपीडीमध्ये येणाऱ्या १५० महिलांमधील जवळपास ५० महिलांचे अंडाशय कमकुवत होते. या महिलांचे वय ३० ते ४० इतके असले तरीही ५० ते ५५ वर्षांच्या महिलांप्रमाणे त्यांचे अंडाशय कमकुवत झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, अनहेल्दी खाणे, लाइफस्टाइलमध्ये येणारा बदल, याशिवाय ऑफिस आणि घरातील कामाचा ताण यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. काही प्रकरणांमध्ये असेही आढळून आले आहे की आयव्हीएफ दरम्यान महिलांना देण्यात येणारी औषधे अंडाशयाला इजा पोहोचवत असल्याने महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी होत आहे.
advertisement
मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही Pregnant आहात की नाही, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
इतकंच नाही तर ३० ते ४० वयाच्या महिलांमध्येही प्री-मेनोपॉजची स्थिती पाहायला मिळत आहे. या स्थितीत महिलांच्या अंडाशयात अंड तयार होण्याची प्रक्रिया बंद होते आणि त्यांची प्रजनन क्षमता पूर्णपणे प्रभावित होते. ही एक गंभीर समस्या आहे. कारण सामान्यतः कॅन्सरमुळे ही स्थिती उद्भवते. मात्र आता कोणताही गंभीर आजार नसलेल्या महिलाही या समस्येच्या विळख्यात येत आहेत.
या समस्येपासून वाचण्यासाठी बचावपद्धती
नियमित व्यायाम करावा, लठ्ठपणा नियंत्रणात ठेवावा. पौष्टिक आहार घ्यावा. यात ताज्या भाज्या, फळे, प्रथिने यांचा समावेश असावा. फास्टफूड, तेलकट, खारट आणि अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. मानसिक आणि शारिरीक ताण कमी करावा. यासाठी आपले मन आणि शरीर चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवावे.
महिलांनी वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर याचा थेट प्रभाव त्यांच्या प्रजनन क्षमतेवर पडू शकतो. परिणामी वंध्यत्वाचा धोका वाढेल.