केटोजेनिक आहाराला सामान्यतः किटो डाएट आहार म्हणतात. हा एक उच्च चरबी, मध्यम प्रथिने आणि कमी कार्ब आहार आहे, जो सामान्यतः वजन कमी करण्यासाठी ओळखला जातो. हा विशेष आहार शरीराला उर्जेसाठी कर्बोदकांऐवजी चरबी जाळण्यास प्रोत्साहित करतो. यामुळे लोकांचे वजन कमी होते. तज्ज्ञांच्या मते केटो डाएट फॉलो केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. हा आहार मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. गंभीर मानसिक आजारांपासून मुक्त होण्यासाठी केटो आहार प्रभावी ठरू शकतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
advertisement
किटो डाएट मानसिक आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या अहवालानुसार, एका नवीन अभ्यासात असे सूचित केले आहे की कमी-कार्ब आणि उच्च चरबीयुक्त पदार्थांनी समृद्ध केटोजेनिक आहार गंभीर मानसिक आजाराची लक्षणे कमी करू शकतो. या आहारामुळे वजन वाढणे आणि मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम देखील कमी होऊ शकतात.
स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील क्लिनिकल चाचणीमध्ये स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त 23 रुग्णांवर हा अभ्यास केला गेला. असे आढळून आले की गंभीर मानसिक आजार सुधारण्यासाठी केटो आहार प्रभावी ठरू शकतो. संशोधकांनी स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर असलेल्या रुग्णांना 10 टक्के कर्बोदके, 30 टक्के प्रथिने आणि सुमारे 60 टक्के चरबीयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला.
केटोजेनिक आहाराचे पालन केल्यानंतर 4 महिन्यांनंतर, 79 टक्के रुग्णांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. संशोधकांच्या मते, केटोजेनिक आहार चयापचय परिणाम स्थिर करण्यास मदत करू शकतो. खरं तर, गंभीर मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी दिलेल्या औषधांचे चयापचयाशी दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि वजन वाढते.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, किटो डाएट चयापचय समस्या सुधारून मानसिक लक्षणे सुधारू शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, हा अभ्यास खूपच लहान होता आणि स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर असलेल्या रुग्णांवर किटो डाएट खरोखरच अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन प्रभाव टाकू शकतो का यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.
मात्र आतापर्यंत अनेक अभ्यासांनी किटो डाएट मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले आहे. अल्झायमर रोग आणि एपिलेप्सीच्या उपचारांमध्ये केटोजेनिक आहार प्रभावी ठरू शकतो असा दावाही अनेक संशोधनांनी केला आहे. परंतु, तुम्हाला कोणतीही मानसिक समस्या किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा आहार घ्या.
Disclaimer : (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)