तोंडात अल्सर होण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी काही गोष्टींमुळे याचा धोका वाढतो. त्या म्हणजे, तोंडात दुखापत होणे, पोटात उष्णता वाढणे आणि हार्मोनल चेंजचा समावेशही यात आहे. तोंडातील अल्सरची समस्या काही दिवसात बरी होते, परंतु समस्या आणखी वाढण्यापूर्वी काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. तोंड येणे खूप वेदनादायक असते आणि त्यामुळे खाण्यापिण्यात अडचण येते. आज आपण ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.
advertisement
Perfumesचे पीरियड्स, इनफर्टिलिटीशी कनेक्शन? जाणून घ्या पुरुषांनी का टाळावं
हे काही घरगुती उपाय आहेत:
1. मीठ आणि लवंग
एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण काही वेळ तोंडात ठेवा आणि नंतर काढून टाका. यानंतर लवंग चघळावे. या घरगुती उपायाने तोंडाच्या फोडांपासून आराम मिळू शकतो.
2. हळद
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळा आणि गार्गल करा. यामुळे तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होऊ शकते.
ही आहे दात चमकवण्याची बेस्ट ट्रीक, टूथपेस्टशिवाय होईल काम
3. मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तोंडाच्या फोडांवर मध लावा. यामुळे फोड लवकर बरे होतात.
4. बटाटा
बटाटा कापून त्याचा रस काढा. नंतर हा रस तोंडाच्या व्रणावर लावा. अल्सरच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
5. खोबरेल तेल
खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तोंडाच्या फोडांवर रोज थोडे खोबरेल तेल लावा. यामुळे फोडापासून लवकर आराम मिळू शकतो.
