घरी कंडिशनर बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील अंडी, दही, मध हे तीन घटक उपयुक्त ठरतात. यापासून कंडिशनर कसं तयार करायचं पाहूया.
अंडी - अंडी आरोग्यासाठी चांगली असतातच पण केसांसाठीही एक उत्तम कंडिशनर देखील आहेत. त्यात प्रथिनं आणि फॅटी एसिड भरपूर असतात. यामुळे केसांचं पोषण होतं, केस मऊ होतात आणि केसांवर चांगली चमक येते.
advertisement
Intestines : पचनव्यवस्था चांगली राखण्यासाठी या टिप्स ठरतील उपयुक्त, नक्की वाचा
दही - दही हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे केस हायड्रेटेड राहतात आणि मुलायम होतात. त्यात लॅक्टिक एसिड देखील असतं, यामुळे टाळू स्वच्छ करण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
मध - मधामुळे उत्तम आर्द्रता मिळते. केसांतला ओलावा यामुळे टिकून राहतो. यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी राहतात. एका स्वच्छ भांड्यात अंड फोडा. केस खूप कोरडे असतील तर अंड्याचा पिवळा भाग वापरू शकता, पण केस तेलकट असतील तर अंड्याचा फक्त पांढरा भाग वापरावा. सामान्य केसांसाठी, संपूर्ण अंड वापरणं चांगलं.
Carrots : गाजरांमुळे दृष्टी सुधारते का ? गाजर किती प्रमाणात खावं ?
अंड्यात दोन-तीन चमचे साधं दही मिसळा. केसांची लांबी आणि कोरडेपणा यावर दह्याचं प्रमाण कमी-जास्त करता येतं. एक टेबलस्पून शुद्ध मध घाला आणि सर्व साहित्य चांगलं मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. यात गुठळ्या होणार नाहीत याची खात्री करा. केसांना शाम्पू केल्यानंतर, जास्तीचं पाणी पिळून काढा. तयार केलेलं कंडिशनर केसांना मुळांपासून टोकांपर्यंत पूर्णपणे लावा.
अर्धा तास मिनिटे तसंच राहू द्या. आवडत असेल तर शॉवर कॅप देखील घालू शकता. नंतर केस कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे कंडिशनर वापरू शकता.
