सागर : अनेक जण उन्हाळ्यात संपूर्ण वर्षाभरासाठी एकाच वेळी गहू खरेदी करतात आणि गहू वर्षभर सुरक्षित राहावा, यासाठी केमिकलचा वापर करतात. मात्र, असे करू नये. वर्षभर गहू सुरक्षित राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पूर्णपणे देशी पद्धत सांगणार आहोत. यामुळे गहू खराबही होणार नाही आणि त्यात किटकही पडणार नाहीत. विशेष म्हणजे हा उपाय करुन तुम्ही फक्त वर्षभरच नव्हे तर 3-4 वर्ष गहू सुरक्षित ठेऊ शकतात.
advertisement
जेव्हाही तुम्हाला गहू दळायला जायचे असेल त्यावेळी तुम्ही तो गहू काढून धुवून घ्यावा आणि वाळल्यावर वापर करू शकतात. या संपूर्ण प्रक्रियेत गव्हात कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही. ही प्रक्रिया नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊयात.
फ्रीमध्ये गहू राहील अनेक वर्ष सुरक्षित -
21 व्या शतकात लोकं गहू खराब होऊ नये म्हणून गव्हाला केमिकल किंवा त्यामध्ये औषधीचा वापर करुन ठेवतात. मात्र, केमिकल टाकलेला हा गहू नुकसानदायक असते. म्हणून मध्यप्रदेशात अनेक शतकांपासून गहूमध्ये राख मिसळण्याची परंपरा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणतीही समस्या नसते, तसेच तुमच्या आरोग्यालाही धोका नसतो.
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा
गव्हामध्ये विविध प्रकारचे कीटक तयार होऊन जातात किंवा त्याला बुरशी लागते म्हणून वर्षभरासाठी गहू खरेदी केल्यावर त्याला सुरक्षित ठेवणे हे सर्वांसमोर मोठे आव्हान असते. म्हणून आपला मेहनतीच्या पैशांनी घेतलेला गहू खराब होऊ नये म्हणून अनेक जण गहू सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या गोळ्या गव्हाच्या गोणीत टाकतात किंवा या गव्हावर केमिकल शिंपडतात.
यानंतर जेव्हा खाण्यासाठी या गव्हाचा वापर केला जातो, तेव्हा धुवावे लागते. मात्र, यावेळी केमिकलचा वास जात नाही आणि आरोग्यालाही याचा फटका बसतो.
हे काम करा -
फक्त उन्हाळ्यात वीटभट्टी किंवा भांडे तयार करण्यासाठी इंधनाचा वापर केला जातो. हे इंधन अनेक दिवस जळत राहते. जेव्हा मातीपासून बनवलेली वस्तू तयार होते, तेव्हा त्यात फक्त राख उरते. अशावेळी मजूर हे विटा किंवा मातीची भांडी काढतात आणि राख फेकून देतात. या राखेला अवाची राख म्हणतात. पण मध्यप्रदेशातील लोक भट्टीतून ही राख उचलून घरी आणतात आणि गव्हात मिसळून ठेवतात. यामुळे वर्षानुवर्षे गव्हावर किडे येत नाहीत आणि गहू खराब होत नाहीत.
या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, चुकूनही करू नका ही 5 कामे, महत्त्वाची माहिती
भट्टीतून आणलेली राख आधी शुद्ध करावी लागते. कारण यामध्ये दगड वगैरे असतात. यामुळे तिला गाळून घ्यावी लागते. यानंतर धान्याच्या गोणीवर टाकून द्यावी. गव्हात मिसळून द्यावी. यानंतर जिथे पावसाळ्याच्या दिवसात ओलावा नसेल आणि इतर दिवशी हवा देखील उपलब्ध नसेल, अशा ठिकाणी या गव्हाला ठेवावे.
सानोधा गावातील द्रोपती बाई सांगतात की, आरोग्याला धोका पोहोचेल अशी कोणतीही वस्तू आम्ही धान्यात मिसळत नाहीत. आमच्याकडे गावात गहू सुरक्षित ठेवण्यासाठी घरोघरी राख वापरली जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आली आहे.