TRENDING:

Womens Day : 'या' आहेत भारतातील 10 सर्वात श्रीमंत महिला, पहिलं नाव वाचून वाटेल आश्चर्य

Last Updated:

अनेक महिला स्वतःच्या पायावर तर उभ्या राहिल्याच, पण अनेकींनी स्वतः उद्योग उभे करून, त्यांचा विस्तार करून जगभरात नाव कमावलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आठ मार्च हा जागतिक महिला दिन. त्या निमित्ताने सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. प्रगती केलेल्या महिलांच्या प्रेरक कथा शेअर केल्या जातात. पूर्वीच्या काळी भारतात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पडण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला; मात्र स्त्रियांनी त्या संघर्षात सातत्य ठेवलं आणि आज सर्वच क्षेत्रांत त्यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर दिसतो. अनेक महिला स्वतःच्या पायावर तर उभ्या राहिल्याच, पण अनेकींनी स्वतः उद्योग उभे करून, त्यांचा विस्तार करून जगभरात नाव कमावलं. अर्थातच या महिला स्वतःच्या कष्टांनी श्रीमंतही झाल्या. भारतातल्या अशा काही श्रीमंत महिलांची थोडक्यात माहिती घेऊ या.
भारतातील 10 सर्वात श्रीमंत महिला
भारतातील 10 सर्वात श्रीमंत महिला
advertisement

स्वतःच्या प्रयत्नांनी अब्जाधीश बनलेल्या व्यक्तींच्या बाबतीत भारताने जागतिक पातळीवर तिसरं स्थान पटकावलं आहे. भारतात 105 अब्जाधीश आहेत. बदलतं चित्र असं आहे, की यात आता महिलाही दिसू लागल्या आहेत. भारतातल्या सर्वांत श्रीमंत 10 व्यक्तींमध्ये सावित्री जिंदाल या एकमेव महिला आहेत. देशातल्या सर्वांत श्रीमंत 10 महिलांची माहिती घेऊ या. ही माहिती फोर्ब्ज रिअल टाइम बिलेनिअर्स रँकिंगवर आधारित असून, ती 30 जानेवारी 2024पर्यंतची आहे.

advertisement

1. सावित्री जिंदाल : या 73 वर्षांच्या असून, त्यांचा जन्म आसाममध्ये तिनसुकिया इथे झाला. त्यांची संपत्ती 29.1 अब्ज डॉलर्स असून, त्या ओ. पी. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन एमेरिटस आहेत. या भारतातल्या सर्वांत श्रीमंत महिला आहेत. 2005मध्ये पती ओ. पी. जिंदाल यांच्या निधनानंतर ग्रुपचा वारसा त्यांच्याकडे आहेत. 2005मध्ये आणि 2009मध्ये त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत हिस्सारमधून विजय प्राप्त केला होता. त्या हरियाणा सरकारमध्ये 2013 साली कॅबिनेट मंत्री झाल्या.

advertisement

2. रोहिका सायरस मिस्त्री : या 56 वर्षांच्या असून, त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांची संपत्ती 8.7 अब्ज डॉलर्स आहे. टायकून पालनजी मिस्त्री हे त्यांचे सासरे, नामवंत वकील इक्बाल चाघला हे त्यांचे वडील, तर दिवंगत सायरस मिस्त्री हे त्यांचे पती. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शेअर्स वारसारूपाने मिळाल्यावर रोहिका यांचं नाव सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत आलं. टाटा सन्समध्ये त्यांची 18.4 टक्के भागीदारी आहे.

advertisement

3. रेखा झुनझुनवाला : यांची संपत्ती 8 अब्ज डॉलर्स असून, त्या 59 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. दिवंगत पती राकेश झुनझुनवाला यांचा कारभार आता त्या पाहतात. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा स्टॉक पोर्टफोलिओ पत्नीकडे आला आणि त्यांचा श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश झाला. त्यांची 29 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

4. विनोद गुप्ता : 79 वर्षांच्या विनोद गुप्तांची संपत्ती 4.2 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा जन्म पंजाबात पतियाळामध्ये झाला. विनोद आणि त्यांचे पुत्र अनिल राय गुप्ता हे हॅवेल्स ही इलेक्ट्रिकल उत्पादनांची कंपनी चालवतात. विनोद यांचे दिवंगत पती किमतराय गुप्तांनी ही कंपनी स्थापन केली होती. 50हून अधिक देशांमध्ये या कंपनीचा पसारा असून, 114 प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत.

advertisement

5. स्मिता कृष्णा-गोदरेज : 73 वर्षांच्या स्मिता कृष्णा-गोदरेज यांची संपत्ती 3.3 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. या प्रतिष्ठित गोदरेज घराण्यातल्या असून, कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांचा 20 टक्के वाटा आहे. होमी भाभा यांचं वास्तव्य असलेलं मेहरांगीर हे घर त्यांनी 372 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. 5.2 अब्ज डॉलर्सच्या गोदरेज ग्रुपचं नियंत्रण या कुटुंबाच्या हातात आहे.

6. लीना गांधी-तिवारी : 66 वर्षांच्या लीना यांची संपत्ती 3.2 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा जन्म मुंबई उपनगरात झाला. जागतिक फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनी असलेल्या यूएसव्हीच्या त्या चेअरमन आहेत. त्यांचे वडील विठ्ठल गांधी यांनी रेव्हलॉनसह 1961 साली या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी खासकरून डायबेटीस आणि हृदयरोगावरची औषधं बनवण्यासाठी ओळखली जाते. 2018मध्ये या कंपनीने जुटा फार्मा ही जर्मन जेनेरिक्स फर्म विकत घेतली.

7. फाल्गुनी नायर : 60 वर्षांच्या फाल्गुनी यांची संपत्ती 3 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. आधी त्या इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या, आता त्या उद्योजक आहेत. नायका या त्यांच्या कंपनीचा आयपीओ यशस्वीरीत्या दाखल झाल्यानंतर 2021मध्ये त्यांच्या संपत्तीत तब्बल 963 टक्के वाढ झाली. त्याआधी त्या कोटक महिंद्रा कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्या भारतातल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड अब्जाधीश महिला आहेत. जागतिक पातळीवर त्यांचा या बाबतीत 10वा क्रमांक लागतो.

8. अनू आगा : 81 वर्षांच्या अनू आगा यांची संपत्ती 2.8 अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. 1980च्या दशकात त्यांनी पतीसह थरमॅक्स कंपनीत कामाला सुरुवात केली. पतीच्या निधनानंतर 1996मध्ये सूत्रं त्यांच्याकडे आली. 2004मध्ये त्या पायउतार झाल्या आणि त्यांची मुलगी मेहेर पदुमजी हिच्याकडे कंपनीची सूत्रं गेली. 26 एप्रिल 2012 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना राज्यसभेच्या खासदार केलं. टीच फॉर इंडिया नावाची ना नफा तत्त्वावर चालणारी संस्थाही त्यांनी स्थापन केली.

9. किरण मझुमदार-शॉ : 70 वर्षांच्या किरण शॉ यांचा जन्म बेंगळुरूत झाला. त्यांची संपत्ती 2.5 अब्ज डॉलर्स आहे. त्या पहिल्या पिढीतल्या उद्योजक आहेत. त्यांनी 1978 साली गॅरेजमध्ये बायोकॉन ही कंपनी स्थापन केली. इन्शुलिन उत्पादनाची आशियातली सर्वांत मोठी फॅक्टरी या कंपनीची असून, ती मलेशियात आहे. कंपनीचा आयपीओ आल्यावर त्यांची संपत्ती वाढली. गेल्या वर्षी त्यांनी अमेरिकेतली व्हायात्रिज ही कंपनी 3 अब्ज डॉलर्सना घेतली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
सर्व पहा

10. राधा वेम्बू : 51 वर्षांच्या राधा वेम्बूंचा जन्म चेन्नईत झाला. त्यांची संपत्ती 2.1 अब्ज डॉलर्स आहे. झोहो या टेक कंपनीच्या त्या सहसंस्थापक आहेत. 2007पासून त्या झोहो मेलच्या प्रॉडक्ट मॅनेजर आहेत. झोहो कंपनीच्ये रेव्हेन्यूने 2021मध्ये एक अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला. तेव्हाच राधा यांची संपत्ती 127 टक्क्क्यांनी वाढली.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Womens Day : 'या' आहेत भारतातील 10 सर्वात श्रीमंत महिला, पहिलं नाव वाचून वाटेल आश्चर्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल