छपरा, 4 नोव्हेंबर : आयुर्वेदात असे अनेक घरगुती उपाय सांगितलेले आहेत, ज्यांमुळे आपण सुदृढ राहू शकतो. आपल्या दिवसाच्या सुरुवातीवर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो, असंही आयुर्वेद सांगतं. दिवसाची सुरुवात विविध पदार्थांनी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांचे फायदेही वेगवेगेळे असतात. जसं की, सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं, लिंबू पिळलेलं पाणी प्यावं, इत्यादी. मात्र आज आपण उपाशीपोटी लवंग खाण्याचे फायदे पाहणार आहोत.
advertisement
लवंग केवळ आपल्या जेवणाची चव वाढवण्याचं काम करत नाही. तर आपण संपूर्ण दिवसभर ऊर्जावान राहावं यासाठीदेखील मदत करते. कारण लवंग औषधी गुणांनी परिपूर्ण असते. विविध आजारांवर ती रामबाण मानली जाते.
तुरीच्या ओल्या दाण्यांपासून अशी करा घरीच कचोरी; एकदम आवडीने खाल
बिहारच्या सारणमधील आयुर्वेदाचार्य स्वामी संदीपाचार्य यांनी सांगितलं की, सकाळी उपाशीपोटी लवंग चावणं अत्यंत लाभदायी असतं. यामुळे पोटाचे विकार बरे होतात. पोटात होणाऱ्या किड्यांपासून मुक्ती मिळते. शिवाय शरीर स्वच्छ होण्यासही मदत मिळते. गॅस मुळापासून नष्ट होतो. पचनसंस्थादेखील सुरळीत सुरू राहते.
ही औषधी वनस्पती अनेक आजारांवर फायदेशीर, ताप, खोकल्यासाठी तर रामबाण उपाय
स्वामी संदीपाचार्य म्हणाले की, दात दुखल्यावर दाताखाली लवंग ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र लवंगाचा वापर हा केवळ दातदुखी दूर करण्यापर्यंत मर्यादित नाहीये. तर, लवंगाच्या तेलाच्या नुसत्या वासानेच डोकेदुखीही दूर पळते. लवंगात सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय लवंग अँटीऑक्सिडंटचाही चांगला स्रोत आहे. त्यामुळे उपाशीपोटी लवंग खाल्ल्यास रक्तातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत मिळते. आपली हाडं कमकुवत असल्यास उपाशीपोटी खाल्लेली लवंग त्यावरही चांगला आराम देते, हाडं मजबूत करते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g