तुरीच्या ओल्या दाण्यांपासून अशी करा घरीच कचोरी; एकदम आवडीने खाल

Last Updated:
हिवाळ्याच्या हंगामात तुरीचे दाणे हे घरोघरी उपलब्ध असतात. या तुरीच्या ओल्या दाण्यांपासून सोप्या घरगुती पद्धतीने कचोरी बनवता येऊ शकते.
1/6
 कचोरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे आणि सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. हिवाळ्याच्या हंगामात तुरीचे दाणे हे घरोघरी उपलब्ध असतात. या तुरीच्या ओल्या दाण्यांपासून सोप्या घरगुती पद्धतीने कचोरी बनवता येऊ शकते. याची रेसिपी  येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
कचोरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे आणि सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. हिवाळ्याच्या हंगामात तुरीचे दाणे हे घरोघरी उपलब्ध असतात. या तुरीच्या ओल्या दाण्यांपासून सोप्या घरगुती पद्धतीने कचोरी बनवता येऊ शकते. याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
advertisement
2/6
तुरीच्या दाण्यांच्या कचोरीचे साहित्य : दोन वाटी मैदा, एक वाटीभर तुरीचे दाणे, 4-5 लसूण पाकळ्या, हिरवी मिरच्या, वाटीभर चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हळद, धने पावडर,ओवा, धने आणि सोप हे साहित्य लागेल.

3/6
तुरीच्या दाण्यांची कृती : सर्वप्रथम कचोरीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी सोप आणि धने मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्यायची. आणि कढईत अगदी थोडसं तेल घालून तुरीचे दाणे, मिरची आणि लसूण पाकळ्या 5 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडसं थंड झाल्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये जिरं-मोहरी, सोप-धान्याची भरड, हळद, मीठ, जिरेपूड, अ‍ॅड करून एकत्र करून घ्या.

4/6
त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले तुरीच्या दाण्यांचं मिश्रण त्यावर लिंबू पिळून कोथिंबीर अ‍ॅड करून हे सगळं 5 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. थोडंस थंड झाल्यावर गोळे करून ठेवूया म्हणजे कचोरी बनवायला सोपं होईल. त्यानंतर एका भांड्यात दोन वाटी मैदा घेऊन त्यात मीठ, ओवा, 1 मोठा चमचा तेल अ‍ॅड करून पाण्याने घट्ट मळून घ्यायचे आहे. मैदा भिजवून झाल्यावर 10 मिनिटं झाकून ठेवा.

5/6
आता छोटा गोळा लाटून घेऊन त्यात कचोरीचा मसाल्याचा गोळा ठेवून चांगलं बंद करून हलक्या हाताने लाटून घेऊया किंवा हाताने दाबून घेऊ शकता. आता कढईत तेल गरम करून कोमट तेलातच आपल्याला कचोरी टाकून कमी आचेवर तळून घ्यायचे आहेत. कचोरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आता तुरीच्या दाण्यांची चविष्ट कचोरी खाण्यासाठी तयार आहे, असं अंकिता काकडे यांनी सांगितलं.

6/6
तुरीच्या दाण्यांचा उपयोग वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे तुरीच्या दाण्यांची कचोरी तुम्ही देखील अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही रेसिपी करून बघू शकता. आणि दही कांदा कोथिंबीर आणि बारीक शेव या साहित्याने सजावट करून तुरीच्या दाण्याची कचोरी सर्व्ह करू शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement