1. द अचिव्हर
जर तुम्ही खालची अर्धी बाजू झाकलेला अर्धा चंद्र निवडलात तर तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात ठरवलेले ध्येय गाठणारे आहात. तुमच्या स्वभावात प्रभावित करण्याची क्षमता आहे. तुम्ही आशावादी, लोकांमध्ये मिसळणारे आहात. तुमच्या ऊर्जावान दृष्टिकोनातून तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. तुम्ही स्थिरता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारे आहात. विश्वासार्ह वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम घ्यायला तयार असता. तुम्ही मेहनती आहात आणि सभोवताली चांगलं सकारात्मक वातावरण असावं, असं तुम्हाला वाटतं.
advertisement
2. द क्रिएटिव्ह
जर तुम्ही वरची अर्धी बाजू झाकलेला अर्धा चंद्र निवडलात तर तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक सौंदर्याने भरलेलं, मूर्त आणि भावनात्मक रुपावर आधारित आहे. तुमची चतुर, कोमल आणि मानसिक बाजू तुम्हाला खूप जागरूक बनवू शकते. पण तुम्हाला तुमची कामुकता भौतिक प्रयत्नांकडे घेऊन जाते. खरं तर आयुष्य एक दुसऱ्यांवरील परोपकार आणि आत्मभोगाचं एक रोलर-कोस्टर आहे.
3. द एनर्जेटिक
जर तुम्ही ढगांआड लपलेला चंद्र निवडलात तर तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन उत्साही आहे आणि तुमचं व्यक्तिमत्त्व एक ठोस चारित्र्य आहे. तुमचा संतुलित स्वभाव तुम्हाला एक विश्वसनीय आणि स्थिर कार्यकर्ता, जोडीदार व मित्र बनवतो. तुमची ऊर्जा तुमच्या व तुमच्या जवळच्या लोकांचा आनंद कायम ठेवण्यासाठी खर्च होते. ज्यांना जे हवंय, त्यांना ते मिळेल, याची तुम्हाला खात्री करायची असते.
4. द कम्पॅशनेट
जर तुम्ही पूर्ण चंद्र निवडलात तर जगातील दुर्दशेबद्दल तुम्ही संवेदनशील आहात. तुमची ही सवय तुम्हाला समाजातील अविश्वसनीय रूपाने दयाळू, उदार आणि प्रेम करणारी व्यक्ती बनवते. तुमच्यामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा असते. कारण त्यांच्या त्या गरजा पूर्ण होत नाही, हे तुम्हाला दिसत असतं. त्यामुळे तुमचं संवेदनशील मन तुम्हाला त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सांगत असतं.
