1) केटोजेनिक डाएट (केटो डाएट)
केटो डाएटमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त फॅट्स घेतले जातात. यामध्ये दररोज 50 ग्रॅमपेक्षा कमी कार्बोहायड्रेट्स खाल्ले जातात. यामुळे शरीर 'केटोसिस' (Ketosis) अवस्थेत जाते, जिथे चरबी ऊर्जेचा मुख्य स्रोत बनते. या डाएटमध्ये अंडी, ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवलेले चिकन आणि पालक किंवा झुकिनी नूडल्ससोबत सॅल्मन मासे यांचा समावेश असतो.
advertisement
2) मध्यम लो-कार्ब प्लॅन
ज्यांना आहाराबाबत थोडी लवचिकता हवी आहे, त्यांच्यासाठी मध्यम लो-कार्ब प्लॅन (दररोज 100-150 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स) चांगला आहे. यात स्टार्च नसलेल्या भाज्या, कडधान्ये, कमी चरबीचे मांस आणि क्विनोआ किंवा ब्राऊन राईससारख्या धान्यांचा कमी प्रमाणात समावेश असतो. तळलेल्या भाज्यांसोबत ग्रील्ड टोफू किंवा चणा डाळ घालून चिकन सॅलड असे पदार्थ यात येतात.
3) पालेओ-प्रेरित आहार (Paleo-Inspired Eating)
पालेओ डाएट काटेकोरपणे 'लो-कार्ब' नसले तरी, त्यात धान्य, डेअरी उत्पादने आणि अतिरिक्त साखर वगळल्यामुळे प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स नैसर्गिकरित्या कमी होतात. यात मांस, सी-फूड, फळे, भाज्या आणि सुकामेव्यावर भर दिला जातो, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
4) स्मार्ट जेवण नियोजन (स्मार्ट मील प्लॅनिंग)
लो-कार्ब डाएट यशस्वी होण्यासाठी जेवणाची तयारी (मील प्रेप) महत्त्वाची आहे. प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स खाण्याची इच्छा टाळण्यासाठी फ्लॉवर राईस स्टिर-फ्राय, बेरीजसोबत ग्रीक दही, किंवा पनीर आणि भाज्यांचे स्क्युअर्स (शिंक) असे पर्याय नेहमी तयार ठेवा.
वनस्पती-आधारित पोषणतज्ञ आणि परिवर्तन तज्ञ डॉ. रोशनी संघवी म्हणतात, "लो-कार्ब डाएट वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी असू शकतात, विशेषतः जेव्हा ते नैसर्गिक पदार्थ आणि निरोगी चरबीला प्राधान्य देतात. यातील मुख्य गोष्ट म्हणजे सातत्य – तुमच्या जीवनशैलीला साजेसा आणि विविध पदार्थांना परवानगी देणारा आहार निवडा."
सर्वात चांगला लो-कार्ब जेवण प्लॅन तोच असतो जो संतुलित, आनंददायक आणि टिकवून ठेवण्यास सोपा असतो. कार्बोहायड्रेट्सच्या काटेकोर प्रमाणापेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे आहे, तुमच्या शरीरासाठी कोणता डाएट काम करतो ते शोधा आणि ते फाॅलो करा.
हे ही वाचा : Rest In Workout Sessions : जिम सेशननंतर विश्रांती का आवश्यक आहे? फायदे वाचून चकित व्हाल..
हे ही वाचा : मोहरीचे तेल की ऑलिव्ह ऑईल? स्वयंपाकासाठी कोणते तेल आरोग्यदायी, तज्ज्ञ काय सांगतात?